FD Interest Rate : भारतात अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांना आणि बँकांच्या FD योजनांना प्राधान्य दाखवितात. लॉंग टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी देखील अलीकडे एफडीला प्राधान्य दाखवले जात आहे. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.
तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटने कपात केली आहे. आधी रेपो रेट 6.50% असे होते मात्र आता हा रेट 6.25% पर्यंत कमी झाला आहे.

दरम्यान रेपो रेट मध्ये कपात झाली असल्याने होम लोन सहित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात होणार आहे. तर दुसरीकडे, एफडी योजनांच्या व्याजदरात सुद्धा कपात होण्याची शक्यता आहे. मात्र, आज आपण सध्या स्थितीला एफडीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.
Federal Bank : फेडरल बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. तीन वर्षांच्या एफडीवर ही बँक सामान्य ग्राहकांना 7.10% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% दराने परतावा देत आहे.
कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँक तीन वर्षांच्या कालावधीच्या FD वर आपल्या सामान्य ग्राहकांना सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% दराने व्याज देत आहे. कोटक महिंद्रा बँक ही देशातील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे.
एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील नागरिकांना 7.50% व्याजदराने परतावा देत आहे. एचडीएफसी ही देशातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआयने सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत एचडीएफसीचा समावेश केला असून ही भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे.
ICICI Bank : भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत आयसीआयसीआय या खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेचा सुद्धा समावेश होतो. एचडीएफसी प्रमाणेच ही प्रायव्हेट बँक देखील तीन वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना सात टक्के दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% दराने व्याज देते.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेचा भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत समावेश होतो. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के दराने परतावा देत आहे आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.25 टक्के दराने परतावा देते.