FD वर मिळणार 9.10% व्याज ! ‘या’ बँकेने आणली खास ऑफर

FD मध्ये पैसा गुंतवायचा आहे, मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. कारण की, आज आपण अशा 3 बँकांची माहिती घेणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना FD वर साडेआठ टक्क्यांपेक्षा अधिकचे व्याज देतात. यातील एक बँक एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 9.10% दराने व्याज देते.

Published on -

FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. अलीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. आरबीआय ने रेपो रेट मध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक टक्क्यांची कपात केली आहे.

रेपो रेट मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी 0.25 टक्क्यांची आणि या चालू आर्थिक वर्षात 0.75 टक्क्यांची कपात झाली आहे. दरम्यान आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर देशभरातील विविध प्रमुख बँकांनी आपल्या एफडीच्या व्याजदरात सुद्धा कपात केली आहे.

मात्र आजही अशा काही छोट्या स्मॉल फायनान्स बँका आहेत ज्या की एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज ऑफर करत आहेत. देशात अशी एक स्मॉल फायनान्स बँक आहे जी की एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तब्बल 9.10% दराने व्याज देत आहे.

ही बँक गुंतवणूकदारांना देते सर्वाधिक व्याज  

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 9.10% दराने व्याज देते. ही बँक 1001 दिवसांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना 9.10% दराने व्याज देत आहे.

नक्कीच जर तुम्ही तीन कोटी रुपयांपेक्षा कमी पैसे एफडी मध्ये गुंतवण्याचा तयारीत असाल आणि साधारणता 1000 दिवसांच्या कालावधीसाठी तुम्हाला एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे.

या बँकाही एफडीवर देतात सर्वाधिक व्याज

सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक तीस महिन्यांपासून ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे.

या कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या बँकेकडून 8.80% दराने व्याज दिले जात आहे. परंतु हे व्याजदर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील दोन ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज ऑफर करते.

या बँकेकडून या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे मात्र हे व्याजदर सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी लागू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!