‘ही’ बँक एफडीवर SBI पेक्षा अधिक व्याज देते! 15 महिन्यांच्या एफडी योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

आयसीआयसीआय ही देखील अशीच एक बँक आहे. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. एसबीआय आणि एचडीएफसी प्रमाणेच आयसीआयसीआय बँक देखील संपूर्ण सुरक्षित बँक आहे. येथे एफडी केल्यास ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत. दरम्यान आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या 15 महिन्याच्या एफडी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
FD News

FD News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. मात्र देशात अशाही काही बँका आहेत ज्या की एसबीआय पेक्षा अधिकचे व्याज ऑफर करत आहेत.

आयसीआयसीआय ही देखील अशीच एक बँक आहे. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. एसबीआय आणि एचडीएफसी प्रमाणेच आयसीआयसीआय बँक देखील संपूर्ण सुरक्षित बँक आहे.

येथे एफडी केल्यास ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत. दरम्यान आज आपण आयसीआयसीआय बँकेच्या 15 महिन्याच्या एफडी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आयसीआयसीआय बँकेची एफडी योजना

प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगला परतावा देते. बँकेची 15 ते 18 महिने कालावधीची एफडी योजना सर्वाधिक व्याज ऑफर करणारी योजना आहे. आयसीआयसीआय बँक या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.80% या दराने व्याज देत आहे.

म्हणजेच सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.55% एवढे अधिकचे व्याज बँकेकडून दिले जात आहे. यामुळे जर तुम्हीही एफ डी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी या बँकेची एफडी योजना फायदेशीर ठरणार आहे.

15 महिन्याच्या FD मध्ये पाच लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार

बँकेच्या कॅल्क्युलेटर नुसार जर आयसीआयसीआय बँकेत एखाद्या सामान्य ग्राहकाने 15 महिने कालावधीसाठी पाच लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्याला मॅच्युरिटीवर पाच लाख 47 हजार 94 रुपये दिले जाणार आहेत.

म्हणजेच सदर व्यक्तीला 47 हजार 94 रुपये व्याज मिळणार आहे. जर समजा याच कालावधीच्या एफडीमध्ये जेष्ठ नागरिक ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवलेत तर त्यांना मॅच्युरिटीवर पाच लाख 50 हजार 806 हजार रुपये दिले जाणार आहेत.

अर्थातच सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून अधिकचा परतावा दिला जातोय. त्यामुळे अलीकडे या बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe