FD News : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान जर तुम्हीही बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. आज आपण आयडीबीआय बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत.
खरंतर आयडीबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजना ऑफर केल्या जात आहे. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करते.

एवढेच नाही तर या बँकेच्या माध्यमातून काही विशिष्ट कालावधीच्या स्पेशल एफडी स्कीम सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान या बँकेने सुरू केलेल्या एका महत्त्वाच्या स्पेशल एफडी स्कीमला नुकतीच मुदत वाढ मिळाली आहे.
या बँकेने उत्सव एफडी योजना सुरू केली होती आणि या योजनेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. आयडीबीआय बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या उत्सव एफडी योजनेला 31 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
म्हणजे या तारखेपर्यंत गुंतवणूकदारांना या योग्य योजनेत गुंतवणूक करता येणार होती. मात्र आता या एफडी योजनेला 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय बँकेने घेतला आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत या योजनेत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणे शक्य होईल.
यानंतर मात्र या स्पेशल एफडी स्कीमला बंद केले जाणार आहे म्हणजेच गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार नाही. आता आपण आयडीबीआय बँकेच्या या उत्सव एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
कशी आहे उत्सव एफडी स्कीम ?
आयडीबीआयची उत्सव एफडी स्कीम 555 दिवसांची एफ डी योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमाल 7.90% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. या योजनेचा सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिक फायदा मिळतो.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.40 टक्के दराने परतावा दिला जात आहे. त्याचवेळी सिनिअर सिटीजन ग्राहकांना या योजनेतून 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे. सिनिअर सिटीजन ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.90% दराने व्याज दिले जात आहे.
म्हणून जर एखाद्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने यात 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 555 दिवसांत त्याला 79,000 रुपयांचा अतिरिक्त परतावा मिळणार आहे. म्हणजेच दहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 10,79,000 रुपये मिळणार आहेत.