FD News : भारतात फार आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवले जात आहे, सुरक्षित गुंतवणुकीसाठी देशात फिक्स डिपॉझिटला अधिक पसंती मिळते. फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक असून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याजही दिले जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी काही स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान आज आपण देशातील प्रमुख तीन बँकांच्या 444 दिवसांच्या स्पेशल एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) आणि फेडरल बँक या तीन बँका ग्राहकांना 444 दिवसांची स्पेशल FD योजना ऑफर करत आहेत.
आता आपण या तिन्ही बँकांच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत तसेच यामध्ये दोन लाख, 4 लाख अन 6 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याबाबतही जाणून घेणार आहोत.
इंडियन ओव्हरसीज बँकेची 444 दिवसांची FD योजना : या स्पेशल योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 7.30% दराने परतावा दिला जात आहे. यामध्ये दोन लाख गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी वर दोन लाख 18 हजार 397 रुपये मिळतात.
चार लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चार लाख 36 हजार 795 रुपये मिळतात तसेच सहा लाख रुपये गुंतवणूकदारांना सहा लाख 55 हजार 192 रुपये मिळतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाची 444 दिवसांची एफडी योजना : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या स्पेशल एफडी योजनेला अमृत कलश एफडी योजना म्हणून ओळखतात. यामध्ये गुंतवणूकदारांना 7.25 टक्के दराने परतावा मिळतो.
यात दोन लाखाची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दोन लाख 18 हजार 267 रुपये, चार लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 436,534 रुपये आणि सहा लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सहा लाख 54 हजार 801 रुपये मिळतात.
Federal बँकेची 444 दिवसांची FD योजना : यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 7.50% दराने परतावा मिळतो. दोन लाखाची गुंतवणूक केल्यास दोन लाख 18 हजार 919 रुपये, चार लाखाची गुंतवणूक केल्यास चार लाख 37 हजार 839 रुपये आणि सहा लाखांची गुंतवणूक केल्यास सहा लाख 56 हजार 759 रुपये मिळतात.