FD News : तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची राहणार आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय झालाय. गेल्या तीन-चार महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये दोनदा कपात करण्यात आली आहे.
आरबीआयने पहिल्यांदा रेपो रेट मध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली होती, नंतर या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये आरबीआयने यामध्ये पुन्हा एकदा 25 बेसिस पॉईंटची कपात केली.

म्हणजेच गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेट 50 बेसिस पॉईंटने कमी झाले असून हे दर 6.50 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. याचा परिणाम म्हणून देशातील अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केलेली आहे.
Home Loan सहित सर्वच प्रकारचे कर्ज स्वस्त झाले आहे. ग्राहकांना कमी ईएमआय भरावा लागत असल्याने सर्वसामान्यांकडून मोठे समाधान व्यक्त केल जात आहे. कर्जाच्या व्याजदरात ज्या प्रमाणे कपात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात देखील बँकांकडून कपात सुरू आहे.
मात्र, काही बँका आजही आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहेत. यामुळे जर तुम्हाला आरबीआयच्या रेपो रेट मधील कपाती नंतर FD मध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही देशातील एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप तीन बँकांची माहिती घेऊन आलो आहोत.
या बँका देतात सर्वाधिक व्याज
बँक ऑफ महाराष्ट्र : बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी आहेत. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा समाविष्ट आहे. ही पब्लिक सेक्टर मधील बँक 366 दिवसांच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे.
यामुळे ज्या ग्राहकांना एका वर्षाच्या आसपास पैसा गुंतवायचा असेल त्यांच्यासाठी ही एफडी योजना फायद्याची राहणार आहे. खरे तर ही बँक आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची FD ऑफर करते. याशिवाय बँकेकडून काही विशेष FD योजना सुद्धा राबवल्या जातात.
366 दिवसांची ही FD योजना देखील बँकेची एक विशेष एफडी योजना आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.45% दराने व्याज दिले जात आहे. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिनिअर सिटीजन ग्राहक म्हणजेच 60 वर्षांवरील नागरिकांना 7.95% दराने व्याज दिले जाते.
AU स्मॉल फायनान्स बँक : मिळालेल्या माहितीनुसार, ही स्मॉल फायनान्स बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे. बँकेकडून सामान्य नागरिकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना 3.75% ते 7.75% दराने व्याज दिले जात आहे.
सिनिअर सिटीजन ग्राहकांना मात्र बँक अधिकचे व्याज देत आहे. सिनिअर सिटीजन ग्राहकांना म्हणजे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 4.25% ते 8.25% दराने व्याज दिलं जात आहे. तसेच, ही बँक दीड वर्ष कालावधीच्या म्हणजेच 18 महिन्यांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते.
या कालावधीच्या एफडीत 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सामान्य ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.75 टक्के दराने रिटर्न मिळतो आणि जर याच कालावधीचा FD योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 8.25 टक्के दराने रिटर्न दिले जात आहेत.
IDFC फर्स्ट : ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक आहे. या बँकेकडून सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेवर अधिकचे रिटर्न दिले जात आहेत. बँकेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ही बँक आपल्या ग्राहकांना 400 ते 500 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज उपलब्ध करून देत आहे. या बँकेकडून सामान्य ग्राहकांना या कालावधीच्या FD वर 7.50% दराने परतावा दिला जातोय. महत्वाचे म्हणजे याच कालावधीच्या एफडीवर बँकेकडून सीनियर सिटीजन ग्राहकांना आठ टक्के दराने व्याज दिले जात आहे.