FD News : फिक्स्ड डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. FD हा अजूनही भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या बचतीच्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. देशातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक एफडी मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात.
दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी एफडी मध्ये पैसा गुंतवण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण फिक्स डिपॉझिट वर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
FD मध्ये गुंतवणूक केल्याने, ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर एक निश्चित रक्कम व्याज स्वरूपात दिले जाते. SBI, HDFC आणि RBL सारख्या देशातील अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर तब्बल 8.30% पर्यंतचे व्याज ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात या बँकांची सविस्तर माहिती.
कोणती बँक देते सर्वाधिक व्याज
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3% ते 7.10% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.60% पर्यंत व्याज देत आहे.
HDFC बँक : एचडीएफसी ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3% ते 7.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे.
ICICI बँक : ही देशातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3% ते 7.10% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.60% व्याज देत आहे.
IDBI बँक : आयडीबीआय बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करते. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3% ते 6.75% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.50% ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे.
कोटक महिंद्रा बँक : खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2.75% ते 7.20% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 3.25% ते 7.70% व्याज देत आहे.
RBL बँक : ही बँक सीनियर सिटीजन ग्राहकांना सर्वाधिक व्याज देते. सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.80% व्याज आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 4% ते 8.30% व्याज देत आहे.
पंजाब नॅशनल बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 4% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे.