‘या’ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर मिळणार 9.10 टक्क्यांचे व्याज ! कोणत्या बँकेने आणली नवीन योजना? वाचा…

आरबीआयने रेपो रेट मध्ये अलीकडील काही महिन्यात मोठी कपात केली आणि यानंतर देशभरातील विविध बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केलेत. मात्र अशा या परिस्थितीत देखील देशातील काही बँका फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देत आहेत. 

Published on -

FD News : भारतात फार पूर्वीपासून फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली जात आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट चा पर्याय हा फारच लोकप्रिय बनलाय. ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा गुंतवायचा असेल, विशेषतः जर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने तुम्हाला एफडी करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की जेष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देऊ करत आहेत.

या बँका एफडीवर देतात सर्वाधिक व्याज

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर अधिक व्याज देते. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना सध्या स्थितीला 9.10 टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे. ही बँक 1001 दिवसांच्या एफडीवर जेष्ठ नागरिक ग्राहकांना 9.10% दराने व्याज ऑफर करते.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सुद्धा सिनिअर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे. ही बँक 30 महिन्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 8.8 टक्के दराने व्याज देते.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक ग्राहकांना चांगले रिटर्न देते. या स्मॉल फायनान्स बँकेकडून दोन ते तीन वर्ष कालावधीच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना 8.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

स्लाइस स्मॉल फायनान्स बँक : स्लाईस स्मॉल फायनान्स बँक सध्या स्थितीला 18 महिन्यांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज देते. या एफडी योजनेत जे सीनियर सिटीजन ग्राहक गुंतवणूक करतात त्यांना बँकेकडून 8.50% दराने व्याज दिले जात आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी याही बँकेचा पर्याय फायद्याचा राहणार आहे. या बँकेचा पर्याय ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी अधिक फायद्याचा राहील.

कारण म्हणजे ही बँक 888 दिवसांच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्या 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक ग्राहकांना सद्यस्थितीला 8.40% दराने व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!