FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.
खरे तर देशाच्या फेडरल बँकेकडून म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

आरबीआय ने गेल्या तीन-चार महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केलेली आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली त्यानंतर या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आरबीआय कडून रेपो रेट मध्ये पुन्हा एकदा 0.25 टक्के कपात करण्यात आली.
म्हणजेच अवघ्या काही महिन्यांच्या काळातच आरबीआयने रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. सध्या देशातील रेपो रेट हे सहा टक्के इतके असून आगामी काळात यामध्ये आणखी कपात होऊ शकते असा सुद्धा अंदाज समोर येत आहे.
दरम्यान आरबीआयच्या या धोरणात्मक निर्णयानंतर देशातील अनेक बँकांकडून होम लोन सहीत सर्व प्रकारच्या कर्ज व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे.
यासोबतच फिक्स डिपॉझिटच्या व्याजदर देखील देशातील विविध बँकांच्या माध्यमातून कपात करण्यात आलेली आहे.
एकंदरीत आरबीआयचा हा निर्णय कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारा ठरतोय तर गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची यामुळे डोकेदुखी सुद्धा वाढलेली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही देशातील काही बँका फिक्स डिपॉझिट वर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले व्याज ऑफर करत आहेत. दरम्यान आज आपण अशाच टॉप तीन बँकांची आजच्या या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.
कोटक महिंद्रा बँक :
ही देशातील एक प्रमुख खाजगी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडी वर चांगले व्याज देते. सध्या स्थितीला या बँकेकडून 365 दिवसांच्या म्हणजेच एका वर्षाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.8% दराने
आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.30% दराने रिटर्न दिले जात आहेत. तसेच ही बँक 391 दिवस ते 23 महिन्यांच्या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.15% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांना 7.65 टक्के दराने व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँक :
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजेच आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज ऑफर करते. ही बँक एका वर्षाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.7% दराने
आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजे 60 वर्षांवरील ग्राहकांना 7.2% दराने व्याज देते. तसेच 18 महिने ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.05% दराने आणि 60 वर्षांवरील नागरिकांना 7.55% दराने व्याज दिले जात आहे.
एचडीएफसी बँक :
ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना चांगले व्याज ऑफर करत आहे. आरबीआय ने एचडीएफसी बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवलेले आहे.
या बँकेच्या एफडी व्याजदराबाबत बोलायचं झालं तर ही बँक 15 ते 21 महिन्यांच्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते. या कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.05% दराने
आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.55 टक्के दराने व्याज दिले जात आहे. सोबतच ही बँक एका वर्षाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.6% दराने आणि 60 वर्षांवरील नागरिकांना 7.10% दराने व्याज देत आहे.