FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार आहात, पण कोणत्या बँकेत गुंतवणूक करावी, यामुळे गोंधळले आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली.
आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले. मात्र आजही अशा काही छोट्या बँका आहेत ज्या की फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देत आहेत. म्हणून आता आपण दोन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या देशातील टॉप 5 बँकांची माहिती पाहणार आहोत.

दोन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
Yes Bank : ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येस बँकेकडून दोन वर्षांच्या एफडीवर सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजे जर या बँकेत दोन वर्षांसाठी एक लाख रुपयांची एफडी केली तर सात टक्के दराने एक लाख 14 हजार रुपये मिळणार आहेत. अर्थात 14 हजार रुपये दोन वर्षांच्या कालावधीत व्याज म्हणून रिटर्न मिळतील.
इंडसइंड बँक : या बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, ही बँक दोन वर्षांच्या एफडीवर सात टक्के दराने व्याज देत आहे.
म्हणजे जर या बँकेत दोन वर्षांच्या FD मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना एक लाख 14 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना 14 हजार रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
डीसीबी बँक : डीसीबी बँक दोन वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.15 टक्के दराने व्याज देत आहे. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने या बँकेत दोन वर्षांच्या कालावधीसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.15 टक्के दराने एक लाख 14 हजार रुपये मिळणार आहेत.
बंधन बँक : बंधन बँक दोन वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. या बँकेत जर दोन वर्षांसाठी एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर एक लाख 15 हजार रुपये मिळणार आहेत.
आरबीएल बँक : आरबीएल बँक दोन वर्षांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.30% दराने व्याज देत आहे. म्हणजे जर या बँकेत दोन वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर एक लाख 15 हजार रुपये मिळणार आहेत.