365 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या ? पहा टॉप 5 बँकांची यादी

तुम्हीही या नव्या वर्षात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण 2025 मध्ये FD सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
FD News

FD News : फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक सर्वाधिक लोकप्रिय प्रकार. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महिलावर्ग आणि जेष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत. दरम्यान जर तुम्हीही या नव्या वर्षात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.

कारण की आज आपण 2025 मध्ये FD सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिता असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

मंडळी अनेकांच्या माध्यमातून एका वर्षाच्या एफडीवर देशातील कोणत्या बँकेकडून सर्वाधिक व्याज ऑफर केले जात आहे याविषयी विचारणा केली जात होती. अशा परिस्थितीत आज आपण 365 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.

एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका

जना स्मॉल फायनान्स बँक : एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज परतावा देणारी बँक म्हणून या स्मॉल फायनान्स बँकेची ओळख आहे. ही बँक 365 दिवसांच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना 8.25 टक्के दराने परतावा देत असल्याची माहिती हाती आली आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : जना स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील 365 दिवसांच्या एफडीवर 8.25 टक्के दराने परतावा देते अशी माहिती बँकेकडून हाती आली आहे. एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत या बँकेचा दुसरा क्रमांक लागतो.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षाच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या स्मॉल फायनान्स बँकेकडून 8.10% दराने परतावा दिला जात आहे. एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांच्या यादीत या बँकेचा तिसरा नंबर लागतो.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगला परतावा देते. ही बँक 365 दिवसांच्या एफडीवर आपल्या सामान्य ग्राहकांना 8.05% दराने परतावा देते. ही एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणारी चौथी बँक.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँक एफडीवर अधिकचे व्याज देतात. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील एका वर्षाच्या एफडीवर आपल्या सामान्य ग्राहकांना आठ टक्के दराने परतावा देत आहे. ही बँक एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणारी पाचवी बँक.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe