दुष्काळात तेरावा महिना ! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा झाली मोठी वाढ, नवीन रेट लगेच चेक करा

Published on -

Fertilizer Rate : देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे.

रासायनिक खतांच्या किमतीत झालेली ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना अशीच आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या विरोधात मोठा असंतोष पाहायला मिळतोय. खरे तर यावर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.

खरीप हंगामात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी कालावधीत जास्त पावसाची नोंद करण्यात आली आणि यामुळे खरीपातील बहुतांशी पिकांची नासाडी झाली. दुसरीकडे खुल्या बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.

सोयाबीन, कापूस , कांदा अशा साऱ्याच पिकांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान कृषी निविष्ठांच्या किमती सातत्याने आकाशाला गवसणी घालत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक खतांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि यावर्षी पुन्हा एकदा रासायनिक खतांच्या किमतीत दोनशे रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

खरीप हंगाम संपल्यानंतर आता रब्बी हंगामाची चाहूल लागली आहे आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना रासायनिक खतांची गरज भासणार आहे. दरम्यान रब्बी हंगाम सुरू होण्याच्या तोंडावरच शासनाकडून पुन्हा एकदा रासायनिक खतांची किंमत वाढवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.

एक नोव्हेंबर पासून रासायनिक खतांच्या किमती 100 ते 200 रुपयांनी वाढल्या असून येत्या काळात या किमती बॅगमागे आणखी 50 रुपयांनी वाढू शकतात अशी माहिती विक्रेत्यांकडून समोर येत आहे. दरम्यान आता आपण कुठल्या खताची किंमत किती रुपयांनी वाढली आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. 

कोणत्या खतांची किंमत वाढली 

24:24:00 या रासायनिक खतांची किंमत 100 रुपयांनी वाढून 1900 रुपये प्रति बॅग झाली आहे. 

8:21:21 या रासायनिक खतांची किंमत बॅगमागे 175 रुपयांनी वाढून 1975 रुपये प्रति बॅग झाली आहे.

9:24:24 ची किंमत दोनशे रुपयांनी वाढवून प्रति बॅग 2100 रुपये झाली आहे.

पोटॅशची किंमत 145 रुपयांनी वाढून 1800 रुपये प्रति बॅग झाली आहे. 

10:26:26 या रासायनिक खताची किंमत प्रति बॅग 1900 रुपये झाली आहे म्हणजेच यामध्ये दीडशे रुपयांची वाढ झाली. 

14:35:54 या रासायनिक खतांची किंमत बॅगमागे 150 रुपयांनी वाढली आहे आता या खताची बॅग 1950 रुपयांना मिळणार आहे. 

12:32:16 या रासायनिक खताची किंमत प्रति बॅग 1900 रुपये झाली आहे. याची किंमत पण बॅग मागे 150 रुपयांनी वाढली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News