क्रिप्टो मार्केटमध्ये लवकरच जिओ कॉईनची एन्ट्री ! एन्ट्रीआधी ‘या’ ठिकाणी मोफत मिळतायेत जिओ कॉइन, श्रीमंत होण्याची संधी

Tejas B Shelar
Published:

Free Jio Coin : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच आणखी एका सेक्टर मध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी जिओकॉइनसह क्रिप्टो मार्केटमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

याबाबत अजून कंपनीकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे खरंच क्रिप्टो मार्केटमध्ये जिओ कॉईनची एन्ट्री होणार का हा मोठा सवाल आहे. परंतु जिओ कॉइनची क्रिप्टो मार्केटमध्ये इंट्री होण्याआधीच जिओ क्वाईन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत.

जेव्हापासून क्रिप्टो मार्केटमध्ये जिओ कॉइन येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तेव्हापासून जिओ कॉइन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून बातम्यांमध्ये देखील जिओ कॉइनचीचं चर्चा आहे.

असेही म्हटले आहे की, जिओ क्वाईन पुढील बिटकॉइन बनू शकते, हे किती खरे ठरेल, हे तर वेळच सांगेल, परंतु आज आपण जिओ क्वाईन विनामूल्य कसे कमवायचे हे सांगणार आहोत.

कारण की जिओच्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना जिओ कॉइन मोफत मध्ये दिले जात आहेत. आता तुम्हाला जिओ कॉइन अजून क्रिप्टो मार्केटमध्ये आले नाही मग जिओच्या प्लॅटफॉर्मवर हे मोफत कसे दिले जात आहे ? हा प्रश्न पडला असेल. दरम्यान आज आपण तुमच्या मनातील याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत तसेच फ्री मध्ये जिओ कॉइन कसे कमवायचे हे देखील समजून घेणार आहोत.

जिओ क्वाईन कसे मिळवणार?

मंडळी, जिओ क्वाईनबद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु आम्ही आमच्या फोनमध्ये जिओ स्फेअर अ‍ॅप उघडताच आम्हाला जिओ क्वाईन मिळविण्यासाठी साइन इन करा असे लिहिलेले दिसलें.

अ‍ॅपवर खाते तयार करून, आम्ही अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जिओ क्वाईन पर्यायासाठी ऑप्ट-इन पाहिले, ज्याने पुष्टी केली की जिओ क्वाईन क्रिप्टो लवकरच एन्ट्री करणार आहे.

दरम्यान सध्या जिओच्या या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य जिओ क्वाईन मिळवण्यासाठी साइन इन करण्यास सांगितले जात आहे. आता आपण मोफत जिओ कॉइन कसे मिळवायचे हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात.

मोफत जिओ कॉइन मिळवण्याची संपूर्ण प्रोसेस

सर्व प्रथम, आपल्याला आपल्या फोनमध्ये JioSphere अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल, हे अ‍ॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी Google Play Store आणि Iphone च्या वापरकर्त्यांसाठी अँपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.

हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, आपण साइन अप करताच यामध्ये खाते तयार करावे लागेल. हे अॅप आपले नाव आणि मोबाइल नंबर विचारेल. फोन नंबर विचारल्यानंतर, ओटीपी आपल्या नंबरवर येईल, ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, आपले खाते नोंदणीकृत होईल.

खाते तयार केल्यानंतर, इंटरनेट सर्व्हिंगसाठी Jio Sphere ब्राउझर वापरायचे आहे.
मग अ‍ॅप ब्राउझरचा वापर सुरू करत असताना, आपण हळू हळू जिओ कॉइन बक्षिस म्हणून मिळवू शकता. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे विनामूल्य जिओ कॉइन अॅपमध्ये दिलेल्या Polygon वॉलेटमध्ये जमा केले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe