अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात.
अखेर गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कोरोनाचे संकट असूनही गणपती बाप्पाचे आगमन, पूजन यांमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. उलट कोरोनाचे सर्व नियम पाळून अगदी हर्षोल्लासात गणेशोत्सव पार पडला.

गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचे विसर्जन देखील वाजत गाजत केले जाते.
यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहील , जाणून घ्या आज दिवसभरात कोणत्या वेळी गणेशाचे विसर्जन करणे योग्य राहील
अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ – 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05:59 वाजता
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती – 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 05:28 वाजता
सकाळी मुहूर्त – दुपारी 7:39 ते 12:14 वाजेपर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 वाजेपर्यंत
संध्याकाळी मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 वाजेपर्यंत
रात्रीचा मुहूर्त – मध्यरात्री 1:43 ते 3:11 वाजपर्यंत (20 सप्टेंबर)
सकाळी मुहूर्त – सकाळी 4:40 ते दुपारी 6:08 वाजेपर्यंत (20 सप्टेंबर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम