Gas Cylinder Price : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. इंधनाचे आणि सिलेंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतात घरगुती गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी आपल्या भारतात स्वयंपाकासाठी मातीच्या चुल्हीचा वापर होत असे. पण आता गॅस सिलेंडरचा वापर होतोय.
शासनाच्या माध्यमातूनही घरगुती गॅस सिलेंडर वापराला प्रोत्साहन दिले जात असे. यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने विशेष योजना देखील सुरू केली आहे. पीएम उज्वला योजना नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना मोदी सरकारने सुरू केली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. एवढेच नाही तर गॅस रिफील केल्यावर अनुदान सुद्धा मिळते. यामुळे भारतात घरगुती गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे. अगदी खेड्यापाड्यात देखील आता गॅस कनेक्शन पाहायला मिळते.
यामुळे मातीच्या चुलीतून होणाऱ्या धुरापासून महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक ठिकाणी महागडा सिलेंडर दिला जात आहे. सिलेंडरच्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे ग्राहकांकडून आकारले जात आहेत.
केंद्रातील सरकारच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते शिवाय त्यांना गॅस रिफील करण्यासाठी अनुदानही दिले जाते. मात्र काही गॅस एजन्सी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अधिकच्या दरात गॅस सिलेंडर भरून देतात.
जर तुम्हीही उज्वला योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हालाही गॅस सिलेंडर अधिकच्या दरात भरून दिले जात असेल तर तुम्ही याची तक्रार करू शकणार आहात. आज आपण गॅस सिलेंडर महाग मिळत असेल तर कुठे तक्रार केली पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत.
कुठं तक्रार करणार?
घरगुती गॅस सिलेंडरची अर्थातच 14.2 किलो वजनी सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. विशेष म्हणजे यावर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपयांची सबसिडी मिळते. पण ही सबसिडी गॅस रिफील केल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होते.
म्हणजेच तुम्हाला गॅस भरताना पूर्ण रक्कम द्यावी लागते. पण जर गॅस एजन्सी तुमच्याकडून यापेक्षा अधिकची रक्कम वसूल करत असेल तर तुम्ही या विरोधात तक्रार करू शकता. तुम्ही उज्वला योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.
हेल्पलाइन नंबर 1800-266-6696 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही त्या एजन्सी आणि डीलरबद्दल तक्रार करू शकता. यासोबतच तुम्ही एलपीजी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1906 वर सुद्धा तक्रार करू शकता. जर तुम्ही इंडेनचा सिलिंडर वापरत असाल, तर तुम्ही इंडेन गॅस एजन्सीच्या १८००-२३३-३५५५ या हेल्पलाइन क्रमांकावरही तुमची तक्रार नोंदवू शकता.
यासोबतच तुम्ही भारत सरकारच्या https://www.mopnge-seva.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊनही तुमची तक्रार करू शकणार आहात. तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीची पडताळणी केली जाईल, पडताळणी नंतर मग तुमच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होईल. जर यामध्ये कोणी दोषी आढळल तर त्यावर कारवाई होईल.