General Knowledge Marathi : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. जाणकारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. यामुळे रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात सहजतेने जाता येते शिवाय रेल्वेचा प्रवासा खिशाला परवडणारा असतो यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात.
हेच कारण आहे की शासनाच्या माध्यमातून देशातील रेल्वे नेटवर्क दिवसेंदिवस वाढवले जात असून सध्या स्थितीला आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारताच्या रेल्वे नेटवर्कला ओळख प्राप्त झाली आहे. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे सध्या इंडियन रेल्वेचे जाळे 67 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

महत्त्वाचे म्हणजे देशभरातील हजारो किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांवर सध्या स्थितीला 13 हजाराहून अधिक रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये मालगाड्यांचा समावेश नाही म्हणजेच मालगाड्यांचा समावेश केला तर रेल्वेगाड्यांचा आकडा आणखी अधिक दिसणार आहे. विशेष बाब अशी की भारतात दररोज अडीच कोटी पेक्षा अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत.
यामुळे भारतीय रेल्वे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. भारतीय रेल्वेच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या की नागरिकांना जाणून घ्यायच्या असतात. दरम्यान आज आपण अशा एका जिल्ह्याची माहिती जाणून घेणार आहोत जिथे भारतीय रेल्वेचे स्थानक तर आहेच शिवाय आपल्या शेजारील देशाच्या रेल्वेचे स्थानक सुद्धा आहे.
हा आहे भारतातील एकमेव जिल्हा जिथे आहेत दोन देशांचे रेल्वे स्थानक
एका अधिकृत आकडेवारीनुसार भारतातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या ही जवळपास साडेसात हजार इतकी आहे. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे कारण की देशात अजूनही अनेक नवनवीन रेल्वे स्थानकांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि येत्या काही दिवसात ही कामे पूर्ण होतील अशी आशा आहे.
दरम्यान भारतातील बिहार राज्यातील मधुबनी हा एक असा जिल्हा आहे जिथे दोन देशांचे रेल्वे स्थानक आहेत. या ठिकाणी भारतीय रेल्वेचे स्थानक तर आहेच शिवाय आपले शेजारील राष्ट्र नेपाळचे रेल्वे स्थानक सुद्धा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील जयनगर या ठिकाणी नेपाळचे रेल्वे स्टेशन आहे.
तसेच या ठिकाणी भारतीय रेल्वेचे स्थानक सुद्धा आहे. दरम्यान या दोन्ही रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी रेल्वे कडून ओव्हरब्रिज बांधण्यात आला आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबनी जिल्ह्यात असलेले हे रेल्वे स्टेशन हे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. त्यानंतर शेजारील देशाची सीमा सुरू होत असते.
अशा परिस्थितीत येथे नेपाळचे रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्यात आले आहे. यामुळे मधुबनी जिल्ह्यात असणाऱ्या या रेल्वेस्थानकावरून भारत आणि नेपाळमधील अनेक प्रवासी प्रवास करतात. तथापी, भारताहून नेपाळला जाण्यासाठी आणि नेपाळहून भारतात येण्यासाठी प्रवाशांना कडक तपासणीतून जावे लागते. दोन देशांचे रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी प्रवाशांचे सर्व सामान आणि कागदपत्रे तपासल्यानंतरच शेजारच्या देशाच्या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जातो अशी माहिती जाणकार लोकांनी यावेळी दिली आहे.