100000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 45 हजार रुपयांचे व्याज! ‘ही’ आहे 2026 मधील पोस्टाची सुपरहिट योजना

Published on -

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉझिट च्या व्याज दरात कपात केली आहे. आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी देखील एफडी व्याज दरात मोठ्या प्रमाणात कपात केली असून याचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतोय. पण जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून विविध प्रकारच्या बचत योजना राबवल्या जात आहेत. पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजना देखील राबवते. पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला अनेक जण फिक्स डिपॉझिट म्हणून ओळखतात. दरम्यान आज आपण पोस्टाच्या फिक्स डिपॉझिट योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे पोस्टाची एफडी योजना

पोस्टाच्या एफडी योजनेला टाईम डिपॉझिट योजना या नावाने ओळखले जाते. पोस्टाची ही योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. टाईम डिपॉझिट योजनेचे स्वरूप पूर्णपणे एफडी योजनेसारखे आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना म्हणतात. यामध्ये गुंतवणूकदारांना एकाच वेळी पैसा गुंतवावा लागतो आणि गुंतवलेल्या रकमेवर एका ठराविक व्याजदराने परतावा मिळतो. महत्त्वाची बाब म्हणजे बँकांच्या एफडी योजनांच्या तुलनेत पोस्टाच्या एफडी योजनेतून ग्राहकांना अधिक व्याज मिळते.

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 45 हजार रुपयांचे व्याज

मिळालेल्या माहितीनुसार पोस्टाच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9%, दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के, तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% आणि पाच वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने व्याज दिले जाते.

अशा परिस्थितीत जर पोस्टाच्या पाच वर्षांच्या म्हणजेच 60 महिने कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूकदारांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 45 हजार रुपये व्याज मिळणार आहे. पाच वर्षांच्या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर एक लाख 44 हजार 955 मिळतात म्हणजेच 44,955 रुपये संबंधित गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतात.

या योजनेचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे येथे गुंतवणूकदारांना कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या ठिकाणी कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा सेट करण्यात आलेली नाही. अर्थात गुंतवणूकदाराला हवी तेवढी रक्कम तो या योजनेत गुंतवू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News