Career Tips In Agri:- भारत हा शेतीप्रधान देश आहे व शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे जोडधंदे शेतकऱ्यांच्या माध्यमातून केले जातात. विशेष म्हणजे आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे शेतीचे रुपडे आता पार बदलून गेले असल्याने शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय नावारूपाला आले आहेत.
तसेच शिक्षणाच्या किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेती संबंधित अनेक अशा शाखा किंवा क्षेत्र आहेत यामध्ये तुम्ही अभ्यास करून किंवा पदवी मिळवून भविष्यामध्ये चांगले करिअर सेट करू शकतात व लाखो रुपये पगाराची नोकरी देखील मिळवू शकतात.

शेती क्षेत्रामध्ये तुम्ही कृषी तसेच कृषी शास्त्र आणि फलोत्पादनाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पदवी मिळवू शकतात व याच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये तुमचे भविष्य सेट करू शकतात.
बारावी सायन्स केल्यानंतर कोणत्याही चांगल्या संस्थेमध्ये तुम्हाला जर ॲग्रीकल्चर क्षेत्राशी किंवा एग्रीकल्चर बॅचलरला प्रवेश घ्यायचा असेल तर उमेदवारांना प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागते. तसेच काही संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया देखील असू शकतात.
कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे क्षेत्रे
उमेदवार हे त्यांच्या आवडीनुसार बीएससी इन फॉरेस्ट्री, बीएससी इन ॲनिमल हजबंडरी, बीएससी इन जेनेटिक प्लांट ब्रीडिंग आणि बीएससी इन सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमांचा अभ्यास करून चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते.
तसेच युजी, पीजी किंवा रिसर्च लेवलवर तुम्ही कोणत्याही स्तरावर कोर्स करू शकतात व इतकेच नाही तर विशिष्ट क्षेत्रात स्पेशलायझेशन देखील करू शकतात. यामध्ये तुम्ही पीक विज्ञान, मृदा विज्ञान, कीटक शास्त्र व कृषी अभियांत्रिकी अशा क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवून आर्थिक दृष्ट्या चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते.
कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणत्या पदांवर काम करू शकता?
जेव्हा तुम्ही कृषी क्षेत्रातील तुमचा अभ्यासक्रम किंवा अभ्यास पूर्ण कराल तेव्हा तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करून कृषी शास्त्रज्ञ, हॉर्टिकल्चर थेरपीस्ट,
कृषी अभियंता, सस्टेनीबिलिटी एक्सपर्ट अर्थात शाश्वतता विशेषज्ञ, कृषी अर्थशास्त्रज्ञ, फार्म मॅनेजर, पीक सल्लागार आणि कृषी संशोधक या महत्त्वाच्या पदांवर काम करू शकतात.
कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किती पगार मिळू शकतो?
कृषी क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये पगार मिळू शकतो. मॅनेजर या पदासाठी 50 ते 70 हजार रुपये पगार तुम्ही घेऊ शकतात व या क्षेत्रात तुम्ही जास्तीत जास्त 90 हजार रुपयापर्यंत पगार मिळवू शकतात.
कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी या आहेत देशातील टॉप संस्था
तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइंबतूर, पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना, कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड,पुसा समस्तीपुर येथील राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठाचे डॉ. चंद्रशेखर आजाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ,हिसार आणि राजमाता विजय राजे सिंधिया कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर या संस्थांचा समावेश यामध्ये होतो.