ट्रॅक्टर घ्यायचे तर महिंद्राचे ओजा घ्याल की कुबोटाचे निओस्टार? वाचा कोणते राहील बेस्ट? जाणून घ्या माहिती

मोठे ट्रॅक्टरपेक्षा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे वळला असून ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमती मधील मिनी ट्रॅक्टर उत्पादित करण्यात आलेले आहेत.

Ajay Patil
Published:
mahindra oja tractor

मोठे ट्रॅक्टरपेक्षा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे वळला असून ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमती मधील मिनी ट्रॅक्टर उत्पादित करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील आता मिनी ट्रॅक्टर घेणे सहज शक्य होत असून कमी खर्चात व कमी वेळेत शेतीची मोठी कामे सहजरीत्या पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.

प्रामुख्याने फळबागायतदार शेतकरी फळबागांमधील अंतर्मशागतिकरीता शक्तिशाली अशा मिनी ट्रॅक्टरच्या शोधात असतात व अशा प्रकारचे ट्रॅक्टर खरेदी करतात.

तुम्हाला देखील या दिवाळीच्या निमित्ताने शेती करिता मिनी ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर या लेखात दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते. मिनी ट्रॅक्टर मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा महिंद्रा ओजा 2121 आणि कुबोटा निओ स्टार A211N या दोन्हीपैकी कोणता ट्रॅक्टर तुमच्यासाठी बेस्ट राहील या दृष्टिकोनातून  तुलनात्मक माहिती बघू.

 इंजिनच्या बाबतीत असलेला दोघा ट्रॅक्टर मधील फरक

 महिंद्रा ओजा 2121 ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर असलेले शक्तिशाली 3Di इंजिन दिलेले असून जे 21 हॉर्स पावर आणि 76 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच कुबोटा निओस्टार A211N ट्रॅक्टर मध्ये 1001 सीसी क्षमता असलेले तीन सिलेंडर E-TVCS लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आलेले असून 58.3 एनएम टॉर्कसह 21 एचपी पावर जनरेट करते.

महिंद्रा ओझा ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 18 एचपी आहे व त्याचे इंजिन 2400 rpm जनरेट करते. तर कुबोटा निओस्टार ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 15.4 एचपीची आहे व त्याचे इंजिन 2600 आरपीएम जनरेट करते. हायड्रोलिक क्षमता बघितली तर महिंद्राच्या मिनी ट्रॅक्टरची 950 किलो आहे तर कुबोटाची 750 किलो आहे.

 दोघं ट्रॅक्टरमध्ये असलेली इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

 महिंद्रा ओजा 2121 ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पावर स्टेरिंग सह 12 फॉरवर्ड+ 12 रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे.तर कुबोटा निओस्टार ट्रॅक्टरमध्ये मॅन्युअल स्टेरिंगसह नऊ फॉरवर्ड + 3 रिव्हर्स गिअरबॉक्स सह गिअर बॉक्स दिलेला आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ऑइल एमरस्ड ब्रेक देण्यात आलेले असून जे टायर्स वर मजबूत पकड कायम ठेवतात. महिंद्राच्या ट्रॅक्टरमध्ये सिंक्रो शटल ट्रान्समिशनसह कॉन्स्टंट मेश मध्ये येतो तर कुबोटाच्या ट्रॅक्टरमध्ये कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन

देण्यात आला आहे. तसेच हे दोन्ही मिनी ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतात. तसेच टायर बघितले तर महिंद्रा ओजा 2121 चे आठ इंच× 18 इंचाचे मागील टायर आहेत तर कुबोटाच्या ट्रॅक्टरमध्ये आठ इंच बाय 18 इंचाचे मागील टायर आहेत.

 किती आहे दोन्ही ट्रॅक्टरच्या किमती?

 महिंद्रा ओजा 2121 मिनी ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत 4 लाख 97 हजार ते पाच लाख 37 हजार रुपये दरम्यान ठेवण्यात आली आहे.

तर कुबोटा निओस्टार A211N मिनी ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत चार लाख 66 हजार ते चार लाख 78 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. तसेच महिंद्रा कंपनी मिनी ट्रॅक्टर वर सहा वर्षांची वारंटी देते तर कुबोटाचा हा मिनी ट्रॅक्टर पाच वर्षाच्या वॉरंटीसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe