Gharkul Yojana : भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मात्र आजही देशातील असंख्य नागरिक बेघर आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्य बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून देशातील बेघर असणाऱ्या नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, पीएम आवास योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जात आहे ते फारच तोकडे असून या अनुदानात घर कसे बनवायचे हा मोठा सवाल लाभार्थ्यांच्या पुढे उभा झाला होता.

यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, आता याच योजनेच्या बाबत फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 50 हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्य बेघर लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानुसार, आता पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये ऐवजी एक लाख 70 हजार रुपये मिळणार आहेत.
त्यातील १५ हजार रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता एकूण दोन लाख 9 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.
घरकूल लाभार्थींना फडणवीस सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे आता मूळ अनुदान म्हणून एक लाख 20 हजार रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 90 दिवसांच्या मजुरीपोटी 27 हजार रुपये व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी 12 हजार रुपये आणि ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार 50 हजार रुपये वाढीव मिळणार आहेत.
असे प्रत्येक लाभार्थीस एकूण आता दोन लाख नऊ हजार रुपये मिळतील, अशी माहिती समोर आली आहे.