GK Marathi : भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक प्रमुख साधन आहे. आपल्यापैकी सुद्धा कित्येक जण दररोज रेल्वेने प्रवास करत असते. कारण म्हणजे भारतातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी.
भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे तसेच आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आपल्याच देशात आहे. रेल्वेच्या बाबतीत आशियामध्ये चायना नंतर भारताचाच नंबर आहे.

हे नक्कीच आपल्या देशासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि रेल्वेमुळे देशातील नागरिकांचा प्रवास फारच सोपा झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतातील रेल्वे प्रवास हा फारच स्वस्त आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाता येणे शक्य होते.
यामुळे भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. पण तुम्हाला भारतीय रेल्वेने प्रवास करताना तिकीट हरवलं किंवा तिकीट फाटलं तर काय होत ? तिकीट हरवल्यास रेल्वेने प्रवास करण्यासाठी काय करावे लागते याबाबतची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
तिकीट हरवल्यास काय करावे?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेत प्रवास करताना जर तिकीट हरवले, तर प्रवाशांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. अशावेळी सर्वप्रथम प्रवाशांनी त्वरित जवळच्या आरक्षण केंद्रावर संपर्क साधावा. केंद्रावरून तुम्हाला डुप्लिकेट तिकीट दिलं जातं, ज्यासाठी थोड शुल्क मात्र भराव लागत.
स्लीपर किंवा सेकंड क्लाससाठी 50 रुपये, तर इतर वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. हे तिकीट मूळ तिकीटप्रमाणेच मान्य केले जाते हे विशेष. या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी ती म्हणजे जर तुमचे तिकीट हरवलेले नसेल पण तिकीट फाटलेले असेल तर अशावेळी तुम्हाला डुप्लिकेट तिकीट साठी फारशी रक्कम भरावी लागत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जर तिकीट फाटले असेल, तर प्रवाशाला मूळ भाड्याच्या फक्त 25% रक्कम भरून डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमच्या प्रवासाचे तिकीट 100 रुपयांचं असेल अन ते जर फाटले तर तुम्हाला फक्त आणि फक्त 25 रुपये भरून नवीन डुप्लिकेट तिकीट मिळू शकत.
जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल म्हणजे वेटिंग तिकीट असेल तर मग तुम्हाला डुप्लिकेट तिकीट सुद्धा घ्यावे लागत नाही. अशा परीस्थितीत प्रवाशाने TTE ला माहिती द्यावी लागते. तसेच, जर हरवलेलं मूळ तिकीट पुन्हा सापडलं, तर डुप्लिकेट तिकीट परत करून पैसे मिळवण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.