सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?

साप आणि मुंगूस हे अन्नसाखळी मधील महत्त्वाचे घटक. खरे तर आपण सर्वजण सापाला घाबरतो मात्र मुंगूस सापाला अजिबात घाबरत नाही. पण असे का, मुंगसाला सापाची भीती का वाटत नाही, यामागचे शास्त्रीय कारण काय? याचसंदर्भातील माहिती आज आपण पाहणार आहोत.

Published on -

GK Marathi : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला आपण सर्वजण घाबरतो. सापाच्या चाव्यामुळे माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. भारतात फक्त बोटावर मोजण्याइतक्या सापाच्या जाती विषारी आहेत मात्र तरीही दरवर्षी सर्पदंशामुळे आपल्या देशात हजारो लोकांचा मृत्यू होतो.

यामुळे आपल्यापैकी अनेकांना सापाची भीती वाटते. जंगलातील अनेक बलाढ्य प्राणी सुद्धा सापाला घाबरतात. पण अनेकांना धडकी भरवणारा हा साप मुंगसाला घाबरतो. पण साप मुंगसाला का घाबरतो?  काय आहे या मागचा शास्त्रीय कारण ? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? नाही ना, मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

साप मुंगसाला का घाबरतो?

साप मुंगसाला घाबरण्याचे काही शास्त्रीय कारण जाणकारांनी नमूद केले आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगसाची झपटण्याची पद्धत आणि फुर्ती ही इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मुंगूस हा अतिशय चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो.

दरम्यान या प्राण्याची हीच चपळता त्याच्या कामी येते. असं म्हणतात की, साप जेव्हा हल्ला करतो, तेव्हा त्याचा विषारी दंश टाळणं ही फारच अवघड गोष्ट आहे किंबहुना इतर प्राण्यांसाठी ती अशक्य गोष्ट आहे. पण मुंगूस हा प्राणी या सर्व प्राण्यांना अपवाद ठरतो.

मुंगूस हा त्याच्या जोरदार आणि अतिशय वेगाच्या हालचालीमुळे सापाच्या दंशापासून स्वत:ला वाचवत असतो आणि मुंगूस आणि सापांच्या लढाईत सापाला शेवटी माघारच घ्यावी लागते अनेकदा तर साप या लढाईत मरण सुद्धा पावतो.

या मागचं आणखी एक शास्त्रीय कारण म्हणजे मुंगसाच्या शरीरात सापाच्या विषाच्या विरोधात लढण्यास मदत करणारे काही घटक असतात. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मुंगसाच्या शरीरात Acetylcholine receptors नावाचे रिसेप्टर्स असतात, जे की इतर प्राण्यांमध्ये दिसत नाहीत.

या विशेष गुणधर्मामुळे सापाने चावलं तरीही त्याचं विष मुंगसाच्या शरीरात फारसं काम करत नाही. म्हणजे मुंगूस सापाच्या दंशापासून सुरक्षित राहतो. पण काही वेळा सापाच्या दंशामुळे मुंगूस मरू सुद्धा शकतो. मात्र अशा घटना क्वचितच घडत असतात. दरम्यान मुंगसाची शिकारीची रणनीती ही सुद्धा फारच अचूक आणि उत्तम असते.

तो थेट सापाच्या डोक्यावर हल्ला करून सापाचा शेवट करतो. अन्नसाखळीमध्ये साप हा कोणाचातरी भक्षक आहे आणि कोणाचातरी भक्ष सुद्धा आहे. त्यामुळे सापाच्या डीएनए मध्ये मुंगसाबाबत भीती प्रोग्राम झालेली असते अन एका प्रकारे हा एक सायकॉलॉजिकल दबाव सापावर असतो. म्हणूनच विषारी साप सुद्धा मुंगसासोबतच्या लढाईत हारतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe