हिंदू धर्मात पवित्र समजले जाणार ‘हे’ फळ रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाता येत नाही ! कारण काय ?

भारतीय रेल्वेने प्रवास करणार असाल तर आजची बातमी तुमच्याच कामाची. खरे तर आपल्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतील पण रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करताना एक खास फळ सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भातील रेल्वेच्या नियमांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

GK Marathi : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? अहो, मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेच्याच प्रवासाला पसंती दाखवली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा सुद्धा असतो. परंतु भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम सुद्धा तयार केलेले आहेत. या नियमांची पायामल्ली केल्यास प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाते. यामुळे रेल्वेने तयार केलेले नियम प्रवाशांनी मोडू नयेत असे आवाहन जाणकार लोक करतात.

दरम्यान आज आपण रेल्वे प्रवासामधील अशाच एका नियमाची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना काही फळे सोबत नेता येत नाहीत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण रेल्वे प्रवासादरम्यान काही फळांच्या वाहतुकीवर पूर्णतः बंदी असून असे फळ जर प्रवासी सोबत नेत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते.

दरम्यान आज आपण भारतीय रेल्वेने प्रवास करताना कोणते फळ सोबत नेता येत नाही आणि असे फळ प्रवाशांच्या जवळ आढळले तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.

हे फळ सोबत नेता येत नाही

भारतीय रेल्वेने हिंदू सनातन धर्मात अगदीच पवित्र मानले गेलेले एक फळ वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी आहे. हो बरोबर वाचताय तुम्ही हिंदू धर्मातील पवित्र फळ म्हणजेच नारळ ज्याला आपल्याकडे श्रीफळ सुद्धा म्हणतात ते नारळ रेल्वेने प्रवास करताना सोबत नेता येत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही ट्रेनच्या डब्यात नारळ (शहाळे नाही तर सुके नारळ) सोबत घेऊन प्रवास करू शकत नाही.

नारळ सोबत असल्यास प्रवास का करता येत नाही?

आता तुम्ही विचार करत असाल की, नारळ घेऊन रेल्वेने प्रवास का करता येत नाही. दरम्यान जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, नारळ हे ज्वलनशील असल्याचा युक्तिवाद रेल्वेकडून करण्यात आला आहे. त्यावर असलेली कोरडी साल छोटी ठिणगी पडूनही आग पकडू शकते असे रेल्वेचे म्हणणे आहे आणि यामुळेच नारळ घेऊन प्रवाशांना प्रवास करता येत नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही नारळ सोबत घेऊन प्रवास केला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. याशिवाय रेल्वे प्रवासादरम्यान फटाके, गॅस सिलिंडर ( भरलेला असो किंवा रिकामा असो ) पेंट आणि थिनर या वस्तू सोबत नेता येत नाहीत. याव्यतिरिक्त, इतर प्रवाशांना त्रास होईल अशी कोणतीही वस्तू ट्रेनमध्ये नेण्यास मनाई असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News