गोव्यात घर घेण्याच्या तयारीत आहात का ? मग Goa मधील जमिनीचे भाव कसे आहेत? जाणून घ्या..

Goa Land Price : हल्ली गुंतवणुकीसाठी अनेक जण जमिनी खरेदी करत आहेत. तर काहीजण आपल्या स्वप्नाच्या घरासाठी जमिनीचे खरेदी करतात. दरम्यान जर तुम्हीही गुंतवणुकीसाठी किंवा स्वप्नातील घरासाठी जमीन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

विशेषता ज्यांना पर्यटन नगरी गोव्यामध्ये घर बनवायचे असेल आणि यासाठी जमीन खरेदीचा प्लॅन असेल त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे. कारण की आज आपण गोव्यातील जमिनीचे भाव कसे आहेत हे चेक करणार आहोत.

गोवा हे जगातील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. या ठिकाणी संपूर्ण जगभरातील लोक पर्यटनासाठी गर्दी करतात. गोव्याला लाभलेला अथांग समुद्रकिनारा, येथील हिरवळ, गोव्याचे वातावरण, हिरवागार निसर्ग आणि फॉरेनर्सची रेलचल या साऱ्या गोष्टींमुळे जमीन खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी गोवा हे एक उत्तम अन लोकप्रिय ठिकाण ठरते.

तुम्ही गोव्यात शेतीसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा घर बांधण्यासाठी परफेक्ट लोकेशन वर जमीन शोधत असाल तर येथील घरांच्या किमती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे.

गोव्यात जमिनीचे भाव कसे आहेत?

गोव्यातील जमिनीचे भाव हे जमीन कोणत्या लोकेशनवर आहे, ती जमीन कशी आहे? अशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. मात्र अनेक जण गोव्यात समुद्रकिनारी जमीन घेण्याचा प्लॅन बनवत असतात. यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या जमिनीचा भाव हा इतर जमिनींच्या तुलनेत अधिक असतो.

या जमिनींना मोठी मागणी देखील असते यामुळे समुद्रकिनारी जमीन शोधणे हे देखील एक मोठे चॅलेंजिंग काम आहे. मीडिया रिपोर्टनुसार गोव्यात समुद्रकिनाऱ्यालगत जर जमीन घ्यायची असेल तर एक एकर जमिनीसाठी ग्राहकांना दोन कोटी रुपयांपासून ते 20 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागू शकते.

महत्त्वाचे म्हणजे जर लोकेशन फारच प्रीमियम असेल तर जमिनीचे दर एकरी 30 कोटी रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. पण समुद्रकिनारा सोडून जमीन घेतली तर जमिनीचे दर यापेक्षा कमी राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील बागा, कळंगुट आणि कांदोळी यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांजवळील भागात जमिनीच्या किंमती खूप जास्त आहेत. मात्र किनारी भागांच्या तुलनेत फोंडा, डिचोली, काणकोण, केपे यांसारख्या भागातील जमिनी तुलनेने स्वस्त आहेत.

या गोव्याच्या आतील भागातील जमिनी ग्राहकांसाठी परवडणाऱ्या आहेत. या आतील भागात जमीन घ्यायची असेल तर ग्राहकांना एकरी एक कोटी रुपयांपर्यंतच्या भावात जमीन मिळू शकते. मात्र जमिनीचा हा भाव ती जमीन निवासी जमीन आहे, शेत जमीन आहे की औद्योगिक जमीन आहे यावर अवलंबून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe