7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आला. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आला आहे. तेव्हापासूनच राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळावी ही मागणी जोर धरत आहे.
मात्र असे असले तरी राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे शासनाने आत्तापर्यंत पाठ फिरवली होती. मात्र आता याबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय करण्यासाठी वित्त विभागाकडून एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे, राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पेमेंट सोबत डीए वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे. सदर महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतची डीए वाढीची थकबाकी देखील वर्ग केली जाणार आहे. वित्त विभागाने याबाबतीत एक प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे.
यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाढीबाबतचा शासन निर्णय हिवाळी अधिवेशनानंतर निर्गमित होणार आहे. निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लाभ देण्यात आल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.