स्वस्तात सोन खरेदी करायचं आहे ? मग ‘या’ 5 ठिकाणाहून सोने खरेदी करा, 10 ग्रॅम Gold मागे 15 हजार रुपयांपर्यंत बचत होईल !

आगामी काळात सोने एक लाख रुपयाचा टप्पा सुद्धा गाठू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांनी सोन्याच्या किमती 90 हजारांना टच करण्याची शक्यता आहे. दरम्यान जर तुम्ही अशा परिस्थितीत सोन खरेदीचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. देशांतर्गत बाजारांमध्ये सोन 90 हजाराच्या टप्प्यात पोहोचले आहे आणि जर तुम्हाला अशा परिस्थितीत स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही परदेशातून सोने खरेदी करायला हवे.

Published on -

Gold Buying Tips : सध्या भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती तेजीत आल्या आहेत. सध्या लग्नसराईचा सीजन आहे आणि येत्या काही दिवसात सणासुदीचा हंगाम सुरू होईल अशा परिस्थितीतच सध्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत सोन्याची किंमत 24 कॅरेट सोने 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोने 79,400 आणि 18 कॅरेट सोने 64 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात सोने एक लाख रुपयाचा टप्पा सुद्धा गाठू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांनी सोन्याच्या किमती 90 हजारांना टच करण्याची शक्यता आहे.

दरम्यान जर तुम्ही अशा परिस्थितीत सोन खरेदीचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. देशांतर्गत बाजारांमध्ये सोन 90 हजाराच्या टप्प्यात पोहोचले आहे आणि जर तुम्हाला अशा परिस्थितीत स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही परदेशातून सोने खरेदी करायला हवे.

दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत जिथे प्रतिदहा ग्राम मागे तुमचे दहा ते पंधरा हजार रुपये वाचणार आहेत. म्हणजेच तुम्हाला सोने तब्बल दहा ते पंधरा टक्के स्वस्त पडणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या ठिकाणांची माहिती.

या ठिकाणी सोने खरेदी केल्यास 10 ग्रॅम मागे 15,000 ची बचत

सिंगापूर : जर तुम्ही सिंगापूरला पिकनिक साठी जाणार असाल किंवा कामानिमित्त सिंगापूर जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही येथून सोने खरेदी करायला हवे. येथे आपल्या देशापेक्षा सोने पाच ते आठ टक्के स्वस्त मिळते म्हणजेच ग्राहकांची दहा ग्रॅम मागे 6 ते 7 हजार रुपयांपर्यंतची बचत होते.

मलेशिया : मलेशिया सुद्धा सोने खरेदीसाठी भारतापेक्षा स्वस्त आहे. येथे सोन्याचे दर भारतापेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी कमी आहेत. कमी आयात शुल्क आणि लो मेकिंग चार्जमुळे मलेशियात सोन्याचे दागिने खरेदी करून ग्राहक हजार रुपये वाचवू शकतात. दहा ग्रॅम सोन्या मागे ग्राहकांचे जवळपास आठ ते नऊ हजार रुपये वाचू शकतात.

थायलंड : थायलंडला दरवर्षी अनेकजण पिकनिक साठी जातात. कामानिमित्त देखील अनेक भारतीय येथे स्थायिक झाली आहेत. मात्र हे ठिकाण फक्त पर्यटनासाठीच नाही तर स्वस्त सोने खरेदीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. थायलंडमध्ये बँकॉक आणि पटाया येथे भारताशी तुलना केली असता सोने स्वस्त मिळते.

येथे सोन्यावर लागणाऱ्या करांचे प्रमाण भारताच्या तुलनेत कमी असल्याचे बोलले जाते. तसेच, येथे दागिन्यांचे मेकिंग चार्जेसही कमी आहेत. येथे सोने भारतापेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी स्वस्त असून ग्राहकांनी येथून सोने खरेदी केले तर दहा ग्रॅम मध्ये आठ ते नऊ हजार रुपयांची बचत होऊ शकते.

दुबई : दुबईमध्ये भारताच्या तुलनेत सोने 10 ते 15 टक्क्यांनी स्वस्त आहे. म्हणून दुबई हा सोने खरेदीसाठीचा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. येथे सोन्यावरील वॅट आणि आयात शुल्क कमी आहे. यामुळे जर येथून भारतीय ग्राहकांनी सोने खरेदी केले तर त्यांचा प्रति 10 ग्रॅम मागे 14 ते पंधरा हजार रुपयांचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe