ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरलेत, प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय दर मिळतोय? आताच चेक करा

Gold Price 2025 : सध्या सर्वत्र लग्न सराईचा हंगाम सुरू असून या लग्नसराईच्या सीजनमध्ये सोने खरेदीचा आलेख वाढला आहे. दरवर्षी या हंगामात सोन्याचे खरेदी वाढते आणि सोन्याचे भाव सुद्धा वाढत असतात पण यंदा लग्न सराईच्या सीजनमध्ये सोन्याचे दर कमी झाले आहेत.

आज, सोमवार 27 जानेवारी रोजी सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोन्याच्या भावात गत काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती, पण आज यात किंचित घट आली आहे. बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आलाय अन या मौल्यवान धातूच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली आहे.

24 कॅरेट सोने त्याच्या शुद्धता आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते. त्याच वेळी, 22 कॅरेट सोने त्याच्या ताकदीमुळे ज्वेलर्सची पहिली पसंती राहते. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रमुख शहरांमध्ये 75,500 रुपयांच्या आसपास होता.

गेल्या आठवड्यात मात्र सोने विक्रमी पातळीवर पोहचले होते. दरम्यान आता आपण देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालील प्रमाणे

राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,410 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 75,540 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नमूद करण्यात आला आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरून 82,5600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 75,690 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,410 रुपये इतकी नमूद करण्यात आली. कोलकाता मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,410 रुपये इतकी नमूद करण्यात आली.

चांदीच्या किमतीतही घसरण

फक्त सोनेचं नाही तर मौल्यवान धातू चांदीच्या भावातही आज घसरण पाहायला मिळाली. आज चांदीच्या किमती किलो मागे शंभर रुपयांनी कमी झाल्या आहेत. चांदीच्या किमती आज 97 हजार 400 रुपये प्रति किलोग्राम इतक्या नमूद करण्यात आल्या असून बाजारात मागणी कमी झाल्याने भाव घसरले असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe