सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 19 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. 14 एप्रिल ला अर्थातचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सोन्याच्या किमतीत मामुली घसरण झाली होती. पंधरा तारखेलाही सोन्याची किंमत घसरली. पण सोळा तारखेपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढ होत असून आज 19 तारखेलाही सोन्याची किंमत वाढलेलीचं आहे.

Published on -

Gold Price : सोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग सराफा बाजाराकडे निघण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या दहा ते 15 दिवसांपासून सोन्याच्या किमती तेजीत आल्या आहेत. आधी सुद्धा सोने तेजीतच होते मात्र मध्यंतरी सोन्याची किंमत नव्वद हजार रुपयांच्या खाली गेली होती.

मात्र गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याने अशी काही प्रगती केली आहे की सोने आता एक लाखाच्या जवळ आले आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी अर्थातच 10 एप्रिलला सोन्याची किंमत 93 हजार 380 प्रति दहा ग्रॅम इतकी होती.

नंतर 11 एप्रिल ला यामध्ये आणखी वाढ झाली. 11 एप्रिल ला सोन्याची किंमत 95 हजार 400 रुपयांवर पोहोचली. पुढे 12 एप्रिल ला 95 हजार 670 रुपयांवर पोहोचली. 13 तारखेला मात्र सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात. या दिवशी सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झाला नाही. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सोन्याच्या किमतीत 160 रुपयांची घसरण झाली.

14 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद झाली. 15 एप्रिलला पुन्हा सोन्याच्या किमती 330 रुपयांनी घसरल्या या दिवशी सोने 95 हजार 180 रुपयांना उपलब्ध होते. पुढे 16 एप्रिल ला सोन्याच्या किमतीत 990 रुपयांची वाढ झाली, सोन्याची किंमत 96 हजार 170 रुपयांवर पोहोचली.

17 तारखेला यामध्ये अकराशे चाळीस रुपयांची वाढ झाली अन सोन 97 हजार 310 रुपयांवर पोहोचले. काल 18 एप्रिल 2025 रोजी यामध्ये पुन्हा एकदा 270 रुपयांची वाढ झाली असून सोन्याची किंमत आता 97 हजार 590 रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान आता आपण 19 एप्रिल 2025 रोजी च्या सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव

मुंबई
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

नाशिक
18 कॅरेट – 73,230 / 10 gm
24 कॅरेट – 97,620 / 10 gm
22 कॅरेट – 89,490 / 10 gm

नागपूर
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

ठाणे
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

पुणे
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

कोल्हापूर
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

जळगाव
18 कॅरेट – 73,200 / 10 gm
24 कॅरेट – 97,590 / 10 gm
22 कॅरेट – 89,460 / 10 gm

लातूर
18 कॅरेट – 73,230 / 10 gm
24 कॅरेट – 97,620 / 10 gm
22 कॅरेट – 89,490 / 10 gm

वसई विरार
18 कॅरेट – 73,230 / 10 gm
24 कॅरेट – 97,620 / 10 gm
22 कॅरेट – 89,490 / 10 gm

भिवंडी
18 कॅरेट – 73,230 / 10 gm
24 कॅरेट – 97,620 / 10 gm
22 कॅरेट – 89,490 / 10 gm

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe