सोन्याच्या भावात मोठी घसरण ! पुढील 6 महिन्यात सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार ?

सोने खरेदीचा प्लॅन बनवणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील सहा महिन्यात सोन्याच्या भावाची स्थिती काय राहणार ? याबाबत जाणकार लोकांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Published on -

Gold Price : सोने खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर 2025 हे वर्ष सोन्याच्या बाबतीत विशेष खास राहिले आहे. 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान 2025 च्या सुरुवातीला तेजीत आलेले सोन्याच्या किमतीत आता गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे.

खरे तर गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावाने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपयांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीला सुरू झाली जी आजपर्यंत कायम आहे.

23 एप्रिल ला 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत तीन हजार रुपयांची घसरण झाली. यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती कशा राहणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आज आपण पुढील सहा महिन्यात सोन्याच्या भावाची स्थिती काय राहणार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोन्याच्या किमतीत मोठा चढ-उतार

या वर्षी अगदी सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमतीत खूप चढ-उतार होत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2025 हे वर्ष सुरू झाले तेव्हा सोने 80 हजारांपेक्षा कमी होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांच्या काळात सोन्याच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने एक लाख रुपयांचा टप्पा सुद्धा पार केला. मात्र आता सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर यात मोठी घसरण होत आहे. खरतर, सध्या लग्न सराईचा सीजन आहे पण तरीही सर्वसामान्य ग्राहकांनी सोन्याची खरेदी कमी केली आहे.

दुसरीकडे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यावर्षी आत्तापर्यंत मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सात टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याच कारणामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

पण आता गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे आणि यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळत असून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

सध्या सोन्याला काय भाव मिळतोय?

दहा दिवसांपूर्वी अर्थातच 26 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली मात्र त्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. काल पाच मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. महत्वाचे म्हणजे काल सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 220 रुपयांची वाढ सुद्धा झाली. 

पुढील सहा महिने सोन्याच्या किमती कशा राहणार? 

सोन्याच्या किमतीमध्ये अलिकडे मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. पण सोन्याच्या किमती जास्त दिवस दबावत राहणार नाहीत असा तज्ञांचा विश्वास आहे. सोन्याच्या किमती आता एका लाखाच्या आत आहेत मात्र जास्त दिवस सोन्याच्या किमती दबावात राहणार नाहीत.

सध्या नफा बुकिंगमुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर बाजारात सुरू असलेले टॅरिफ वॉर सुद्धा कमी झाले आहे, पण हे वॉर पूर्णपणे संपलेले नाही. कारण टॅरिफ 90 दिवसांसाठी होल्ड करण्यात आले आहे, आता आगामी काळात जर ते पुन्हा लागू झाले तर सोन्याच्या किमती पुन्हा वाढतील अशी आशा आहे.

असे झाल्यास नोव्हेंबर मध्ये सोन्याच्या किमती पुन्हा एकदा एका लाखाचा टप्पा पार करू शकता. खरे तर येत्या काही दिवसांनी देशात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे आणि यामुळे सोन्याची मागणी वाढेल आणि साहजिकच यामुळे सोन्याचे दरही वाढू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News