Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 24 एप्रिल 2025 ला 10 ग्रॅम सोने किती रुपयांत भेटणार ? पहा 22 & 24 कॅरेट सोन्याचे अपडेटेड दर

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण सुरू झाली आहे. काल सोन्याची किंमत 3000 रुपयांनी कमी झाली असून आज पुन्हा एकदा यामध्ये शंभर रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24 एप्रिल 2025 रोजी सोन्याला काय भाव मिळतोय याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Gold Rate Today : खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बाजारातील अभ्यासकांनी सोन्याच्या किमती एका लाखाच्या वर जाणार असल्याची मोठी भविष्यवाणी केली होती. यानुसार, दोन दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीने एक नवा उच्चांक प्रस्थापित केला असला तरी अवघ्या एका दिवसाच्या काळातच सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण दिसली आहे.

यामुळे आता आगामी काळात सोन्याच्या किमती नेमक्या कशा राहतात ? पुन्हा सोने एका लाखाच्यावर जाणार का असे अनेक प्रश्न सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

दोन दिवसांपूर्वी अर्थातच 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याची किंमत एका लाखाच्या वर गेली. 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचली होती. मात्र योग्य एका दिवसातच सोन्याचा हा तोरा चांगलाच नरमतांना दिसलाय. सोन्याचा तोरा 23 तारखेला कमी झाला.

काल 23 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एका लाखाच्या आत आली. काल 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आली. म्हणजे काल सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे तीन हजार रुपयांनी कमी झाली.

दरम्यान आज 24 एप्रिल 2025 रोजी सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण दिसली आहे. अशा परिस्थितीत आता आपण 24 एप्रिल रोजी 24 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याला महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काय भाव मिळाला आहे ? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
पुणे : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
नागपूर : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
कोल्हापूर : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
जळगाव : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
ठाणे : 22 कॅरेट – 90 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 340 आणि 18 कॅरेट – 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम
नाशिक : 22 कॅरेट – 90 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 370 आणि 18 कॅरेट – 73 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम
लातूर : 22 कॅरेट – 90 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 370 आणि 18 कॅरेट – 73 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम
वसई विरार : 22 कॅरेट – 90 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 370 आणि 18 कॅरेट – 73 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम
भिवंडी : 22 कॅरेट – 90 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट – 98 हजार 370 आणि 18 कॅरेट – 73 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News