Gold Price Predictions : सध्या सोन्याच्या किमती सतत वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत सोन्यात तब्बल २३% वाढ झाली असून ही वाढ साधारणतः एका वर्षात होते, पण यंदा काही महिन्यांतच हा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर कितीपर्यंत पोहोचेल? या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे अंदाज आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर आधारित माहिती आपण पाहणार आहोत.
सोन्याच्या भावात इतकी वाढ का झाली ?
सोन्याच्या किमती वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता. अमेरिका आणि इतर देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे आर्थिक गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी, गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. याशिवाय, जागतिक बँकिंग प्रणालीतील अनिश्चितता, आर्थिक मंदीची भीती आणि वाढती महागाई हे देखील दरवाढीला कारणीभूत घटक आहेत.

वाढ आणि सध्याची स्थित
या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्यात २३% वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यातच ६.५०% इतकी वाढ नोंदवली गेली आहे. काही दिवस दरात थोडीशी घसरण झाली होती, पण पुन्हा एकदा सोन्याने तेजी पकडली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक दोघेही या किमतीकडे लक्ष ठेवून आहेत.
जॉन मिल्स यांचा अंदाज
सोन्याच्या बाजारातील जागतिक विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति तोळा ५६,००० रुपये इतकी राहू शकते. ते म्हणतात की, सध्या सोन्याची किंमत उच्च पातळीवर असून लवकरच बाजारात स्थैर्य येईल. अनेक गुंतवणूकदार आपला नफा बुक करतील आणि त्यामुळे मागणी कमी होईल. याचा परिणाम म्हणून दर थोडे स्थिर किंवा घसरणीकडे जाऊ शकतात.
गोल्डमन सॅक्सच भाकित
दुसरीकडे, गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोल्डमन सॅक्सने आपला अंदाज आणखी वाढवला आहे. त्यानुसार, सोन्याची किंमत वर्षअखेर $३९५० प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. त्यांचा दावा आहे की बँकिंग क्षेत्रात मंदीचा धोका वाढल्यामुळे मध्यवर्ती बँका सोन्यात अधिक गुंतवणूक करत आहेत. तसेच, एक्सचेंज ट्रेडेड फंडांमधूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे, ज्यामुळे मागणी वाढली आहे. त्यांच्या मते, जर मंदीची स्थिती निर्माण झाली, तर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.
भारतीय बाजारातील अंदाज
भारतीय गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात वाढलेल्या मागणीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होणार आहे. अशा परिस्थितीत, वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख रुपयांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः जर जागतिक मंदीचे वातावरण गडद झाले, तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व अधिक वाढेल.
सोन्याच्या किमती सतत वाढत असल्याने योग्य वेळी गुंतवणूक किंवा नफा बुकिंग करतानाच आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक धोके आणि मागणी-पुरवठा याच्या आधारावर वर्षाअखेरीस सोन्याची किंमत ९०,००० ते १ लाख रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने स्वस्त नव्हे तर आणखी महाग होणार आहे.आणि पन्नास हजारांवर सोने येणे हा फक्त एक अंदाज आहे वास्तव नाही.