Gold Price : सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. खरे तर 2024 च्या शेवटी सोन्याच्या किमतीत मोठी विक्रमी वाढ झाली आणि तेव्हापासूनच या मौल्यवान धातूच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड सुद्धा तयार केला आहे.
22 एप्रिल 2025 रोजी इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर पोहोचले. या दिवशी या मौल्यवान धातूची किंमत 1 लाख 1 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. खरे तर, फेब्रुवारी-मार्च मध्ये अनेकांच्या माध्यमातून सोन्याच्या किमती लवकरच एका लाखाच्या वर जाणार असे बोलले जाऊ लागले होते.

मात्र, एवढ्या लवकर एका लाखाच्या वर जाणार असे कोणालाच वाटले नाही. 22 एप्रिलला सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचले मात्र तेवढ्याच झपाट्याने याची किंमत कमी पण झाली. 23 एप्रिल ला सोन्याची किंमत 3000 रुपयांनी कमी झाली.
यानंतर जवळपास 28 एप्रिल पर्यंत सोन्याच्या किमती दबावात पाहायला मिळाल्या. 29 एप्रिलला सोन्याची किंमत 440 रुपयांनी वाढली मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत आता घसरण सुरू झाली आहे. काल अर्थातच एक मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 2180 रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. सोन्याची किंमत आता जलद गतीने घसरत असल्याचे दिसते, पण आता प्रश्न असा निर्माण होतो की, सोन्याच्या किंमतीतील ही घसरण किती काळ चालू राहील. सोने किती काळ घसरत राहील ? डिसेंबर 2025 मध्ये सोन्याचे भाव कसे राहणार ? याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
डिसेंबर 2025 मध्ये सोन्याची किंमत किती असणार?
जाणकार लोक सांगतात की, सोन्याची किंमत भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून असते. दरम्यान आता वेगवेगळ्या तज्ज्ञांचे वेगवेगळे दावे सुद्धा समोर आले आहेत. सोन्याच्या किमतीबाबत जॉन मिल्सचा असा विश्वास आहे की, भविष्यात राजकीय परिस्थिती सामान्य होईल आणि जेव्हा बाजारातील परिस्थिती सुधारेल तेव्हा गुंतवणूकदार बाजारात परत येतील, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत घट होईल.
एवढेच नाही तर सेंट्रल बँक देखील त्यांचा सोन्याचा साठा स्थिर ठेवेल किंवा तो कमी करेल, ज्यामुळे, वाढत्या पुरवठ्यामुळे आणि कमी मागणीमुळे, सोने प्रति औंस 1800 डॉलर पर्यंत खाली येऊ शकते, म्हणजेच, भारतीय बाजारानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा 56 हजार रुपयांपर्यंत घसरू शकते.
दुसरीकडे, गोल्डमनने या उलट अंदाज लावलेला आहे. गोल्डमनच्या मते, सोन्याची किंमत आगामी काळात सुद्धा अशी वाढतच राहणार आहे.
या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत जवळपास साडेचार हजार डॉलर वरती म्हणजेच भारतीय चलनानुसार प्रति तोळा सुमारे एक लाख 38 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे आता सोनं एक लाख 38 हजार रुपयांवर जाणार की 56 हजार रुपयांपर्यंत खाली येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.