सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 13 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा

सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू असून गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्या सोन्याच्या किमती काही हजाराने कमी आहेत. गेल्या महिन्याच्या 22 तारखेला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये इतकी नमूद करण्यात आली. सध्या स्थितीला मात्र सोन्याची किंमत एका लाखाच्या आत आहे.

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 10 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 330 रुपयांची वाढ झाली होती. 10 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

पुढे 11 मे ला सोन्याची किंमत स्थिर राहिली मात्र काल 12 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसली. काल सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 1800 रुपयांची घसरण झाली असून आज आपण 13 मे 2025 रोजी सोन्याची किंमत कशी राहिली याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

12 मे 2025 रोजीच्या सोन्याच्या किमती

काल 12 मे 2025 रोजी मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

तसेच काल नाशिक, भिवंडी, लातूर आणि वसई विरार या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली. 

13 मे 2025 रोजी च्या सोन्याच्या किमती

आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

तसेच काल नाशिक, भिवंडी, लातूर आणि वसई विरार या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe