सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 03 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा…

एक मे पासून सोन्याच्या किमती सातत्याने घसरत आहेत. महाराष्ट्र दिनी सोन्याची किंमत 2180 रुपयांनी कमी झाली होती आणि काल किमती 220 रुपयांनी कमी झाल्यात. दरम्यान आता आपण तीन मे 2025 ला 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा किमती कशा राहिल्यात याबाबतचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत घसरण सुरु आहे, अवघ्या 10-11 दिवसांपूर्वी 1 लाखाच्या वर विकलं जाणार सोन आता एका लाखाच्या आत आलं आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. आगामी काळात या मौल्यवान धातूच्या किमती वाढणार की आणखी घसरणार हा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान याबाबत तज्ञ लोकांकडून वेगवेगळे अंदाज दिले जात आहे. काही तज्ञ लोक सोन्याच्या किमती आगामी काळात कमी होऊ शकतात असे म्हणत आहेत तर काही लोकांच्या माध्यमातून याच्या किमती आणखी वाढू शकतात असे बोलले जात आहे. खरे तर 22 एप्रिलला सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड तयार केला होता.

या दिवशी 24 कॅरेट सोन एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचल होत. परंतु त्यानंतर सातत्याने किमती कमी होत राहिल्या आहेत. दरम्यान आता आपण गेल्या दहा दिवसांमधील किमती आणि तीन मे 2025 रोजी सोन्याचा भाव काय आहे याबाबतही आपण माहिती पाहणार आहोत.

10 दिवसांच्या किंमती कशा राहिल्यात ?

24 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेटचे रेट 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके होते. 25 एप्रिल ला सोन्याचे रेट स्थिर राहिलेत आणि 26 एप्रिल रोजी 24 कॅरेट चे रेट 98 हजार 210 रुपये एवढे राहिले.

दरम्यान 27 एप्रिल रोजी सोन्याचे रेट स्थिर होते आणि 28 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट चे रेट 97,530 रुपये एवढे झालेत. 29 एप्रिल 2025 रोजी रेट मध्ये थोडी सुधारणा झाली या दिवशी 24 कॅरेटचे दर 97,970 रुपये प्रति दहा ग्राम इतके नमूद करण्यात आले.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिलला रेटमध्ये कपास झाली या दिवशी 24 कॅरेटचे रेट 97 हजार 910 रुपये एवढे होते. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या रेट मध्ये 2180 रुपयांची घसरण झाली, या दिवशी सोन 95 हजार 730 रुपयांपर्यंत खाली आलं.

काल अर्थातच दोन मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 220 रुपयांनी कमी झाली या दिवशी सोन्याची किंमत 95,510 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी राहिली. 

3 मे 2025 रोजीचा सोन्याचा भाव काय?

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : राज्यातील या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 540 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर : राज्यातील या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 570 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News