Gold Price Today : काल 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याने आत्तापर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडीत काढलेत. खरे तर काही दिवसांपूर्वी बाजारातील तज्ञ लोकांकडून सोने लवकरच एक लाख रुपयाचा टप्पा गाठणार असा दावा करण्यात आला होता. यामुळे तेव्हापासूनच सोन्याच्या आगामी ट्रेंड बाबत जाणून घेण्याची गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याच्या किमती सातत्याने वाढत राहिल्यात. यामुळे या वर्षाच्या मध्यापर्यंत सोन्याच्या किमती विक्रमी वाढतील अशी आशा देखील होती. पण, सोन्याच्या किमती फारच लवकर एका लाखाच्यावर पोहोचल्या आहेत.

22 एप्रिल 2025 रोजी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा अधिक नमूद करण्यात आली असून आज देखील सोन्याच्या किमतीचा दरवाढीचा हा ट्रेंड कायम असल्याचे दिसते. खरे तर दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 14 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. त्यादिवशी सोन्याची किंमत तोळा मागे म्हणजेच दहा ग्रॅम मध्ये 160 रुपयांनी कमी झाली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर 15 एप्रिल ला सुद्धा सोन्याच्या किमती दबावत राहिल्यात. मात्र 16 तारखेला पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत बदल दिसून आला, या दिवशी सोन्याची किंमत 96170 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
तेव्हापासून सोन्याच्या किमतीचा दर वाढीचा हा ट्रेंड कायम असून काल 22 एप्रिल 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 1,01,350 रुपये एवढी नमूद करण्यात आली. अशा परिस्थितीत आज अर्थातच 23 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय दर मिळतोय याचाच आढावा आता आपण घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, जळगावमधील 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती : या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज 23 एप्रिल 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार वीस रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोने एक लाख एक हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 92,910 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी राहिली.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमधील 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती : आज 23 एप्रिल 2025 रोजी राज्यातील या महत्त्वाच्या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोने एक लाख एक हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 92,940 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी राहिली आहे.