Gold Price Today : सध्या लग्नसराईचा सीजन सुरू आहे आणि यामुळे सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. खरे तर लग्नाचा सीजन आता कुठं सुरू झाला आहे. आगामी काही दिवसात लग्नाचा सीजन पीक वर राहणार आहे.
मात्र या लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याची आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागतोय कारण की सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गोल्ड प्राइस च्या किमती बाबत बोलायचं झालं तर याच्या किंमतीने 86000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
![Gold Price Today](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Gold-Price-Today-4.jpeg)
गेल्या आठवडाभरात देशात २४ कॅरेट सोन्याचा भाव २१८० रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव 2000 रुपयांनी वाढला आहे. दरम्यान बाजारातील अभ्यासकांनी आगामी काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात असे भाकीत वर्तवले आहे.
अनेक जण सोन्याचे दर एक लाख रुपयाचा टप्पा गाठणार असे भाकीत वर्तवत असून यामुळे आता आगामी काळात सोन्याच्या किमती कशा राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, आज, रविवार, 9 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. आता आपण देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईत सोन्याच्या किमती कशा आहेत? याबाबत माहिती पाहणार आहोत.
आर्थिक राजधानीत सोन्याला काय दर मिळतोय?
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,670 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,450 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटची किंमत 79600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
कोलकतामध्ये सोन्याला काय दर मिळतोय?
मिळालेल्या माहितीनुसार कोलकत्यामध्ये आज 9 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,670 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,450 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
जयपुर मध्ये कशा आहेत किमती?
जयपुर मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,600 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
चंदीगड मध्ये कसे आहेत भाव?
चंदीगडमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,600 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
लखनऊ मध्ये कसे आहेत भाव?
लखनऊ मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,600 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
हैदराबादमध्ये कसे आहेत भाव?
आज 9 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,670 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,450 प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली.
अहमदाबाद मध्ये कसे आहेत भाव?
अहमदाबाद मध्ये आज नऊ फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,720 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार पाचशे रुपये नमूद करण्यात आली.
भोपाळ मध्ये कसे आहेत दर?
अहमदाबाद प्रमाणेच आज भोपाळ मध्ये सुद्धा 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,720 प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार पाचशे रुपये नमूद करण्यात आली.
चांदीचे भाव कसे आहेत?
आठवडाभरातील चढउतार पाहिल्यानंतरही, चांदीचा भाव आज आठवड्याभरापूर्वीच्या पातळीवर आलाय. आज, ९ फेब्रुवारीला चांदीचा दर ९९,५०० रुपये प्रति किलो आहे. शुक्रवारी, 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव सलग दुसऱ्या सत्रात 96,500 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. 8 फेब्रुवारीला इंदूरच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली. यानंतर आता चांदीची सरासरी किंमत 95200 रुपये प्रति किलो झाली आहे.