Gold Price Today : आज भारतीय सराफा बाजारात म्हणजेच 06 फेब्रुवारी, 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. सोन्याची किंमती 84 हजाराच्या वर गेल्या आहेत. सोने आता प्रति 10 ग्रॅम 84 हजार रुपयांवर पोहचले आहे.
दुसरीकडे चांदीच्या किमती थोड्याशा घसरले आहेत. चांदीची किंमत प्रति किलो 95 हजार रुपयांवर आली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेसह 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 84,672 रुपये आहे. 999 शुद्धतेसह चांदीची किंमत 95292 रुपये आहे.
इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे 10 ग्रॅम 84657 रुपये होते, जे आज गुरुवारी सकाळी 84672 रुपयांवर पोहोचली आहे. शुद्धतेच्या आधारे, सोन्याची किंमत वाढली आहे आणि चांदी मात्र स्वस्त झाली आहे.
आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर कसे आहेत?
इबजारेट्स.कॉम या अधिकृत वेबसाइटनुसार, आज 10 ग्रॅम प्रति 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 84333 रुपये आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धतेसह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 77560 रुपये आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धतेसह सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 63504 रुपये आहे. त्याच वेळी, 585 (14 कॅरेट) शुद्धतेसह सोने प्रति 10 ग्रॅम 49533 रुपये आहे.
14 कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम नऊ रुपयांनी, 18 कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम अकरा रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्राम 14 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती प्रति दहा ग्राम पंधरा रुपयांनी महागल्या आहेत.
अर्थातचं सोन्याच्या किमतीत आज वाढीचे ट्रेंड होते मात्र सोन्याचे दर फारसे वाढलेले नाहीत. दरम्यान काल शुद्ध चांदीच्या किमती प्रति किलो मागे 95,425 अशा होत्या आज मात्र किलोमागे चांदी 133 रुपयांनी स्वस्त झाली आणि किमती 95 हजार 292 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आल्या आहेत.
सोन्या चांदीच्या किमती कशा पाहणार?
आपण मिस्ड कॉल देऊन सोन्याची आणि चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत शोधण्यासाठी आपण 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता.
थोड्या वेळात आपल्याला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळणार आहे. त्याच वेळी, आपण इबजारेट्स डॉट कॉम या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सकाळी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाणून घेऊ शकता.