Gold Price Today : काल, 1 फेब्रुवारी 2025 ला केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज साऱ्यांच्या नजरा सराफा बाजाराकडे होत्या. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशात सोन्याच्या किंमतीत मोठी स्थिरता पाहायला मिळतं आहे.
2025 मध्ये सोने स्वस्त ?
संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2024-25 आणि जागतिक बँकेच्या ‘कमोडिटी मार्केट आउटलुक’ अहवालानुसार, 2025 मध्ये सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. या विश्लेषणानुसार, कमोडिटीच्या किमती 2025 मध्ये 5.1% आणि 2026 मध्ये 1.7% कमी होऊ शकतात. तर चांदीच्या किमती मात्र वाढण्याची शक्यता असल्याने चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्यात चांगले परतावे मिळू शकतील. आर्थिक घडामोडी आणि जागतिक बाजारपेठांवर आधारित हे अंदाज आहेत, आणि बाजारातील अन्य अनेक घटकांवर (जसे की राजकीय घडामोडी, आर्थिक निर्णय, आणि मौद्रिक धोरणातील बदल) यांचा परिणाम या किमतींवर होऊ शकतो.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
सोन्याच्या शुद्धतेची ओळख करण्यासाठी हॉलमार्किंग ही एक प्रमाणित पद्धत आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे मान्यताप्राप्त, हॉलमार्क हे सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एक सरकारी हमी आहे.
हॉलमार्कचे तीन मुख्य घटक आहेत:
- BIS लोगो: हे लोगो दर्शवतो की सोने भारतीय मानकांनुसार प्रमाणित आहे.
- शुद्धता नंबर (कॅरेट): 999 (24 कॅरेट), 958 (23 कॅरेट), 916 (22 कॅरेट), 875 (21 कॅरेट), आणि 750 (18 कॅरेट) अशी मार्किंग सोन्याच्या शुद्धतेवर केली जाते. हे आकडे सोन्याच्या शुद्धतेचे प्रतिशत दर्शवतात.
- ज्वेलर्स पहचान चिन्ह आणि असेसिंग आणि हॉलमार्किंग सेंटरचे कोड: हे कोड सोन्याची तपासणी कोणत्या केंद्रात झाली आणि कोणत्या ज्वेलर्सने विक्री केली हे दर्शवते.
24 कॅरेट सोने ही पूर्णपणे शुद्ध सोने असून, ती सर्वात मौल्यवान आहे. पण, ती नरम असल्यामुळे सामान्यतः दागिन्यांसाठी वापरली जात नाही. 22 कॅरेट सोन्यामध्ये सोन्याशिवाय इतर धातूंचे मिश्रण असते जसे की तांबे किंवा चांदी, ज्यामुळे ती दागिन्यांसाठी अधिक उपयुक्त होते. सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहणे आवश्यक आहे कारण ते तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि सोन्याची गुणवत्ता सुनिश्चित करते. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री केली नाही तर तुमच्या खरेदीत भेसळ असू शकते.
काय झाला बदल ?
गेल्या 3 दिवसांपासून, सोन्याची किंमतीत वाढ नोंदविली जात होती. मात्र आज देशातील बहुतांशी शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत स्थिरता पाहायला मिळाली आहे. बेंगळुरूमध्ये सुद्धा आज सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात.24 कॅरेट सोन्याची किंमत 84,490 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. काल सुद्धा येथे सोन्याच्या किंमती 84490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होत्या. आज, 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत सुद्धा स्थिरता आहे. बेंगळुरूमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 77450 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. पण एक दिवस आधी, प्रति 10 ग्रॅमची किंमत 77300 रुपये एवढी होती. म्हणजे आज 22 कॅरेट सोने 10 ग्रॅममागे 150 रुपयांनी वाढले आहे. दरम्यान आता आपण देशातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किंमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
शहरांमधील सोन्याच्या किमती
आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम 84640 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 77600 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.
आज, देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,490 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट गोल्ड प्रति 77450 रुपये आहे.
आज, जयपूरमधील 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 84640 रुपये आणि 22 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम 77600 रुपये आहे.
आज, लखनौमधील 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 84640 रुपये आणि 22 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम 77600 रुपये आहे.
आज, कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 84490 आणि 22 कॅरेट गोल्ड प्रति 10 ग्रॅम 77450 रुपये आहे.
सोने कधी खरेदी करावं ?
सोन्याच्या किमतीत वाढ सुरू आहे, आणि ही घोडदौड येत्या काळात सुरूच राहण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणातील बदलामुळे जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या वेळी खरेदी करणे उपयुक्त ठरू शकते. कारण येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती अधिकच वाढू शकतात. अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि मौद्रिक धोरणातील बदलांमुळे सोने ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानली जाते, त्यामुळे त्याची मागणी वाढू शकते.