सोनं लवकरच 55 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येणार ! सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांची घसरण होणार, कारण काय ?

सोन्याच्या किमती जवळपास 94 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचल्या आहेत. दरम्यान येत्या काही दिवसांनी देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे आणि या काळात किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती एक लाख रुपये प्रतितोळापर्यंत जाऊ शकतात असा एक अंदाज आहे. असे असतानाच मात्र आता एक नवीन अंदाज समोर येत आहे ज्यात सोन्याच्या किमती 55 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली येऊ शकतात असे म्हटले गेले आहे.

Updated on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे, आज देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली.

दहा दिवसांपूर्वी अर्थातच 25 मार्च 2025 रोजी 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती अनुक्रमे 89,290 प्रति दहा ग्रॅम आणि 81,850 प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती. म्हणजेच दहा दिवसांच्या काळातच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली असून सध्याचा हा वाढीचा ट्रेंड पाहिला असता सोन्याच्या किंमती लवकरच एका लाख रुपयांचा टप्पा गाठणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील फ्युचर्स मार्केट आणि दिल्ली सराफा बाजारात सुद्धा याची चिन्हे दिसून आली आहेत. देशाच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 91,400 रुपयांवर पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, देशाच्या राष्ट्रीय राजधानीत अर्थातच दिल्लीत सुद्धा सोन्याच्या किंमतींनी 94 हजारांची पातळी ओलांडली आहे. देशाच्या फ्युचर मार्केटमध्ये आणि सराफा बाजारामध्ये, दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किंमती रेकॉर्ड लेवलवर आहेत.

अशातच आता असा एक अंदाज समोर आला आहे ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांपर्यंतची घसरण होण्याचा एक नवा अंदाज समोर येतोय. अशा परिस्थितीत आता आपण सोन्याच्या किमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचे कारण काय सांगितले जात आहे, नेमका हा अंदाज काय आहे याचसंदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे अंदाज

एकीकडे सोने एक लाख रुपयांचा टप्पा गाठू शकते असे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे, असा एक अंदाज बाहेर आला आहे, ज्याने बाजारात मोठा गोंधळ माजलाय. एका अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत, सोन्याच्या किंमती 55 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. याचा अर्थ असा की सोन्याच्या किंमती सध्याच्या किमतीपेक्षा 40 टक्क्यांनी खाली येऊ शकतात.

किंमतीत 38 टक्के घट

चालू वर्षात, सोन्याच्या किंमतींमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मग ते स्पॉट मार्केट असो की फ्युचर्स मार्केट. सोन्याने गुंतवणूकदारांच्या कमाईसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. आता याचा ग्राहकांवर दबाव स्पष्टपणे दिसून येतोय. तथापि, एका अमेरिकन विश्लेषकांनी तीव्र घट होणार असा अंदाज वर्तविला आहे. यूएस आधारित मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकांनी पुढील काही वर्षांत सोन्याच्या किंमतीत 38 टक्के घट होणार असं म्हटलं आहे.

सोन्याची किंमत 55,000…

सोन्याच्या किमतीत सुमारे 40 टक्के संभाव्य घट होणार असा अंदाज समोर आला असून असे झाल्यास भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. अमेरिका स्थित मॉर्निंगस्टारचे स्ट्रैटिजिस्ट जॉन मिल्स यांना असे वाटते की सोन्याचे दर सध्याच्या 3,080 डॉलर प्रति औंसवरून 1,820 डॉलर प्रति औंस पर्यंत खाली येतील.

किमती का घसरणार?

सोन्याचा वाढलेला सप्लाय सोन्याच्या किमतीत घसरण होण्याचे मुख्य कारण ठरू शकते. सोन्याचा ग्लोबल रिजर्व वाढला आहे, ऑस्ट्रेलियाने उत्पादन वाढविले आहे आणि रीसायकल सोन्याच्या पुरवठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती कमी होण्याचा एक नवा अंदाज आता समोर येतोय.

सोन्याचा वाढलेला सप्लाय तर एक मुख्य कारण आहेच याशिवाय गेल्या वर्षी 1,045 टन सुवर्ण खरेदी करणार्‍या मध्यवर्ती बँका आता सोन्याची मागणी कमी करू शकतात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की 71 टक्के केंद्रीय बँका आपली सोन्याची होल्डिंग कमी किंवा कायम ठेवण्याचा विचार करीत आहेत. याशिवाय मार्केट सैचुरेशन सुद्धा सोन्याच्या किमती कमी करण्यात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज

एकीकडे सोन्याच्या किमतीत आगामी काळात घसरण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर दुसरीकडे बँक ऑफ अमेरिकेचा असा अंदाज आहे की, पुढील दोन वर्षांत सोन्याचे 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचणार आहे,

तर गोल्डमॅन सॅक्सने वर्षाच्या अखेरीस याची किंमत 3,300 डॉलर्स पर्यंत पोहचणार असा अंदाज दिला आहे. यामुळे आता आगामी काही महिन्यात सोन्याच्या किमती कमी होतात की अशाच तेजीने वाढत राहतात हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

हे पण वाचा : 801 किलोमीटर लांबीच्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठे अपडेट ! धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याला मंजुरी, वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe