सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा उलटफेर! आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात सोन्याचे दर कसे आहेत ?

महाराष्ट्रात सुद्धा आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या सारखेच दिसून येत आहेत.

Published on -

Gold Price Today : आज जगात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. दरम्यान या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुम्ही तुमच्या प्रियजनासाठी सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत उलटफेर झाला असून सोन्याच्या किमती शंभर रुपयांनी वाढल्यात अशी नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सुद्धा आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या सारखेच दिसून येत आहेत.

आज राज्यात 24 कॅरेट सोन्याची किमत 87,160 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 79,900 रुपये इतका नमूद करण्यात आला आहे. चांदीच्या दराबाबत बोलायचं झालं तर आज चांदी 1,00,500 रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे. चांदीने आता पार 1 लाखाच्या वरचा टप्पा गाठलेला दिसत आहे.

खरंतर सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि म्हणूनच सर्वत्र सोन्याची आणि चांदीची खरेदी जोमात आहे. अशा या परिस्थितीतच सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम):

मुंबई: 79,900 (कालचा दर: 79,800)
पुणे: 79,900 (कालचा दर: 79,800)
नागपूर: 79,900 (कालचा दर: 79,800)
कोल्हापूर: 79,900 (कालचा दर: 79,800)
जळगाव: 79,900 (कालचा दर: 79,800)
ठाणे: 79,900 (कालचा दर: 79,800)
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई: 87,160 (कालचा दर: 87050)
पुणे: 87,160 (कालचा दर: 87050)
नागपूर: 87,160 (कालचा दर: 87050)
कोल्हापूर: 87,160 (कालचा दर: 87050)
जळगाव: 87,160 (कालचा दर: 87050)
ठाणे: 87,160 (कालचा दर: 87050)

सोन्याच्या दरात वाढ का?

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. तसेच, चलनवाढ आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळेही सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe