Gold Price Today : सोना खरेदीसाठी सराफा बाजाराच्या दिशेने निघण्याआधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या दहा-बारा दिवसाच्या काळात सोन्याचे किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. यामुळे ग्राहक तसेच गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
या मौल्यवान धातूच्या किमती गेल्या तीन चार दिवसांपासून सतत घसरत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

मात्र ही दरवाढ जास्त काळ राहिली नाही आणि दुसऱ्याच दिवशी किंमत एका लाखाच्या खाली आली. दरम्यान एप्रिल महिन्यात जशी परिस्थिती तयार झाली होती तसेच परिस्थिती मे महिन्यात सुद्धा तयार झाली.
या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मे महिन्यात सोनं 99 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचलं. मात्र सोन्याच्या किमतीने या महिन्यात एका लाखाचा टप्पा काही पार केला नाही.
दरम्यान, आता गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत असून आज आपण 28 मे 2025 रोजी चे सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत.
आजचे सोन्याचे भाव चेक करा
24 कॅरेट सोन्याचे भाव : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. तसेच, नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
22 कॅरेट सोन्याचे भाव : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. तसेच, नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. तसेच, नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.