सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 29 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतील ?

गेल्या तीन दिवसांच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घोषणा झाली आहे. आजही या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी कपात झाली असून आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट कसे आहेत ? याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोन खरेदी करण्यासाठी सराफा बाजाराच्या दिशेने जात आहात का ? मग सोन खरेदीपूर्वी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरे तर गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला  सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती.

22 एप्रिल 2025 या मौल्यवान धातूची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होते. परंतु सोन्याचा हा तोरा जास्त काळ टिकू शकला नाही आणि लगेचच सोन्याच्या किमती एका लाखाच्या खाली आल्यात.

मे महिन्यात सुद्धा सोन्याची किंमत 99 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होती पण सोन या महिन्यात एका लाखाच्या वर गेलच नाही. तथापि सोन्याच्या किमतीत सातत्याने मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोन्हीही अस्वस्थ दिसतायेत.

दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज देखील सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.

तीन दिवसांपूर्वी अर्थातच 25 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती मात्र 26 तारखेला शुद्ध सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे 440 रुपयांनी कमी झाल्यात. 27 मे 2025 रोजी या किमती आणखी 160 रुपयांनी कमी झाल्यात.

काल 28 तारखेला देखील सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती आणि आजही या मौल्यवान धातूच्या किमतीत काही प्रमाणात घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोन्याच्या आजच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमती : आज 29 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूर आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किमत 97,470 प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वसई विरार, लातूर, भिवंडी आणि नाशिक या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार पाचशे रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे.

22 कॅरेट सोन्याच्या किमती : आज 29 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूर आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किमत 89,340 प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वसई विरार, लातूर, भिवंडी आणि नाशिक या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 370 रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे.

18 कॅरेट सोन्याच्या किमती : आज 29 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूर आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किमत 73,100 प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वसई विरार, लातूर, भिवंडी आणि नाशिक या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 130 रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News