सोन्याची किंमत 90 हजाराच्या खाली ! 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आज किती पैसे मोजावे लागणार ? 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा

सोन खरेदीच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. कारण की, गेल्या पाच दिवसात महाराष्ट्रात सोन्याच्या किमती कशा राहिल्या आहेत ? याचाच आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.

Updated on -

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजाराकडे निघणार आहात? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने बदलत आहेत आणि यामुळे ग्राहक तसेच गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात चिंतेत आले आहेत.

आता ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे आणि यामुळे लग्नसराई सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तरीही अजून काही दिवस लग्न सराई सुरूच राहणार आहे. जुळून आलेल्या रेशीमगाठी आता लग्न बंधनात अडकणार आहेत आणि यामुळे साहजिकच सोन आणि चांदी खरेदी आणखी काही दिवस जोमातच राहणार आहे.

अशी सगळी परिस्थिती असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण 30 मे 2025 रोजी 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा रेट कसा आहे? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.

मागील 5 दिवसांममधील सोन्याच्या किमती

मागील पाच दिवसात सोन्याच्या किमती सतत घसरत राहिल्या आहेत. 26 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 440 रुपयांनी कमी झाली या दिवशी 24 कॅरेट ची किंमत 97,640 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 27 तारखेला पुन्हा एकदा 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 160 रुपयांनी कमी झाली, 28 तारखेला सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात आणि काल 29 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 440 रुपयांनी आणि 22 कॅरेट ची किंमत 400 रुपयांनी कमी झाली.

30 मे 2025 रोजीचे भाव

मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, ठाणे, कोल्हापूर : या शहरांमध्ये आज 18 कॅरेटची किंमत 72 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 88,940 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट ची किंमत 97 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी : आज 30 मे 2025 रोजी राज्यातील या चार शहरांमध्ये 18 कॅरेटची किंमत 72 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट ची किंमत 88,970 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट ची किंमत 97 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe