Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल 13 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 1140 रुपयांची मोठी वाढ झाली.
मात्र आता अवघ्या 24 तासांच्या काळात सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आज 14 मे रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 100 ग्रॅम मागे 5000 रुपयांनी घसरली आहे म्हणजेच दहा ग्रॅम मागे किंमत पाचशे रुपयांनी कमी झाली आहे.

तर दुसरीकडे 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आज 100 ग्रॅम मागे 5400 रुपयांनी घसरली आहे म्हणजेच 10 g मागे किंमत 540 रुपयांनी कमी झाली आहे. शिवाय आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली.
आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 100 ग्रॅम मागे 4,100 रुपयांनी घसरली आहे म्हणजे दहा ग्रॅमची किंमत 410 रुपयांनी कमी झाली. अशा परिस्थितीत आता आपण 14 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
13 मे 2025 रोजी सोन्याचे भाव
काल मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव यासारख्या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती.
तसेच 13 मे रोजी नाशिक लातूर वसई विरार भिवंडी यांसारख्या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती.
राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे भाव
आज मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव यांसारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 540 रुपयांनी कमी झाली, आज या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 50 रुपये प्रति दहा ग्राम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी यांसारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 80 रुपये प्रति दहा ग्राम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.