सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल ! 26 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये काय दर मिळतोय ? वाचा…

22 एप्रिल ला विक्रमी भाव मिळाल्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. 22 एप्रिल रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये एवढी होती, पण आता अवघ्या तीन-चार दिवसांच्या काळातच ही किंमत एका लाखाच्या आत आली आहे.

Published on -

Gold Price Today : सोन आणि चांदीच्या खरेदीसाठी सराफा बाजाराकडे निघताय का ? अहो मग तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्त्वाची आहे. तुम्ही सोन खरेदीला जाण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचायला हवी. खरे तर 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

या दिवशी सोन्याने एक लाख रुपयाचा टप्पा पार केला आणि सोन्याची ही किंमत इतिहासातील सर्वाधिक किंमत म्हणून सुवर्णाक्षरात नोंदवली गेली. पण 22 एप्रिल ला एका लाखाच्या वर गेलेलं सोन 23 एप्रिलला म्हणजेच 24 घंट्याच्या आत पुन्हा एकदा एका लाखाच्या आत आल.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 23 एप्रिलला मात्र या किमतीत तीन हजार रुपयांची घसरण झाली. या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये एवढी नमूद करण्यात आली आणि 24 एप्रिल रोजी यामध्ये आणखी एकशे दहा रुपयांची घसरण झाली.

काल 25 एप्रिल 2025 रोजी मात्र सोन्याची किंमत स्थिर पाहायला मिळाली. काल 24 कॅरेट सोन्याला 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम असा भाव मिळाला असून आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत बदल पाहायला मिळतोय. सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घसरण झालेली आहे

आणि म्हणूनच आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 26 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रात सोन्याचा भाव कसा आहे याचा आढावा आता आपण घेणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे : आज 26 एप्रिल 2025 रोजी राज्यातील या सहा महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : आज 26 एप्रिल 2025 रोजी राज्यातील या 4 महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News