भारत पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 10 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? राज्यातील स्थिती कशी आहे?

सोने आणि चांदीच्या किमतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल दिसतोय. कालपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळतोय तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना याचा फटका बसतोय.

Published on -

Gold Price Today : भारत पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीचा सोन्याच्या भावाला देखील फटका बसतोय. खरंतर पाच मे 2025 पासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत होती. मात्र काल सोन्याचे भाव कमी झालेत.

गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात सोन्याने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. 22 एप्रिल रोजी सोन्याचे दर एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम असे झाले होते. यामुळे सोन्याच्या किमती दीड लाखाच्या आसपास पोहोचणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

मात्र गेल्या महिन्यात सोन्याच्या दरातील ही तेजी फक्त एक दिवस टिकली. अवघ्या 24 तासांमध्ये म्हणजेच 23 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत 3000 रुपयांनी घसरली. त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमतीत दबाव पाहायला मिळाला.

मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली. पाच मे पासून सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. पण भारत आणि पाकिस्तानातं वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत घसरण होऊ लागली आहे.

काल, 9 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 1250 रुपयांची घसरण झाली. दरम्यान आजही सोन्याच्या किमतीतील घसरण कायम आहे. अशा परिस्थितीत आज आपण दहा मे 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय याचा आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : 10 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,140 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,340 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : 10 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,170 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,370 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

चांदीच्या किमती कशा आहेत?

काल नऊ मे रोजी चांदीची किंमत 99 हजार रुपये प्रति किलो एवढी होती मात्र आज यामध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे. आज दहा मे 2025 रोजी कांद्याची किंमत 98 हजार 900 रुपये प्रति किलो एवढी नमूद करण्यात आली आहे.

म्हणजेच सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण होत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळतो तर दुसरीकडे सोने आणि चांदी यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटकाही बसतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News