Gold Price Today : गेल्या महिन्यात सोन्याच्या किमत एका नव्या रेकॉर्डवर पोहोचली होती. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. मात्र 23 तारखेपासून याच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळाली.
एक लाखाच्या वर गेलेली सोन्याची किंमत 95 हजार रुपयांपर्यंत खाली आली होती. म्हणजेच सोन्याच्या किमतीत पाच ते सहा हजाराची घसरण झाली होती. मात्र आता मे महिन्यात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी सुधारणा दिसली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून किमतीत वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये एवढी नमूद करण्यात आली. यानंतर सहा मे रोजी सोन्याच्या किमतीत 2730 रुपयांची वाढ झाली पुढे सात मे रोजी सोन्याच्या किमतीत 540 रुपयांची वाढ झाली.
महत्वाचे म्हणजे आजही सोन्याच्या किमतीत दरवाढीचा ट्रेंड कायम असल्याचे पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत आता आपण आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय भाव मिळालाय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
7 मे 2025 रोजी सोन्याचा भाव काय?
काल, म्हणजेच 7 मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. काल 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 500 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 540 रुपयांनी वाढली.
8 मे 2025 रोजी सोन्याचा भाव काय ?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज आठ मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार दहा रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक लातूर वसई विरार भिवंडी : या प्रमुख शहरांमध्ये आज आठ मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.