सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 29 एप्रिल रोजीचा 10 ग्रॅमचा भाव काय ? महाराष्ट्रातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती पहा….

गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. सोन्याच्या दरवाढीचा हा ट्रेंड पुढे असाच सुरू राहणार असे वाटत असतानाच आता सोन्याच्या किमतीत गेल्या सात दिवसांपासून चांगला मोठा ब्रेक लागल्याचे दिसते. आज 29 एप्रिल ला सुद्धा सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत.

Published on -

Gold Price Today : सोन या मौल्यवान धातूच्या किमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. 22 एप्रिल ला सोनं एका लाखाच्या वर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किमतीत सतत घसरणच होत आहे.

आज सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 22 एप्रिलला सोन्याच्या किमती 3000 ची वाढ झाली होती आणि सोनं एक लाख 1 हजार 350 रुपयांवर पोहोचले होते. मात्र सोन्याचा हा तोरां फक्त एका दिवसाचा होता.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिलला सोन्याच्या किमतीत तीन हजाराची घसरण झाली आणि सोन्याचे दर 98 हजार 350 रुपये प्रति तोळावर पोहोचले. त्यानंतर 24 तारखेला ही सोन्याच्या किमतीत घसरण झाली. त्या दिवशी सोन्याची किंमत 110 रुपयांनी कमी झाली.

25 तारखेला सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या. 26 तारखेला यामध्ये पुन्हा एकदा 30 रुपयांची कपात पाहायला मिळाली. 27 तारखेला मात्र सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात आणि 28 तारखेला यामध्ये 680 रुपयांची कपात पाहायला मिळाली.

काल 28 एप्रिल 2025 रोजी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 97,530 रुपये एवढी राहिली. दरम्यान आज देखील सोन्याच्या किमतीचा घसरणीचा हा ट्रेंड कायमचं असून आता आपण 29 एप्रिल रोजी च्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सोलापूर कोल्हापूर जळगाव ठाणे या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती एकसमान असतात.

मिळालेल्या माहितीनुसार आज 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 520 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,390 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 73140 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे दहा रुपयांची घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : भिवंडी, लातूर, वसई विरार आणि नाशिक या शहरांमध्ये सुद्धा सोन्याच्या किमती एकसमान असतात, मात्र वर नमूद केलेल्या शहरांपेक्षा भिन्न असतात.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज या चार प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 550 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,420 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,170 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News