सोन्याच्या बाजारभावात पुन्हा एक मोठा बदल ! 6 मे 2025 रोजीचा दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

सोन खरेदी करण्याचा प्लॅन आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर गेले काही दिवस सोन्याच्या किंमती स्थिर होत्या मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत काल पाच मे 2025 रोजी प्रति तोळा मागे 220 रुपयांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे? याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोन्याच्या भावात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. खरंतर गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्थातच 27 एप्रिल 2025 ला 24 कॅरेट सोन्याचा भाव 98 हजार 210 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 90 हजार वीस रुपये एवढा होता.

मात्र, आता सोन्याच्या किंमती बऱ्याच कमी झाल्या आहेत. वास्तविक गेल्या महिन्याच्या 22 तारखेला 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये इतकी नमूद करण्यात आली होती.

पण, आता सोन्याचा रेट फारच उतरला आहे. काल 05 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति तोळा मागे 220 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दोनशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे.

पाच मे 2025 रोजीचा भाव

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : काल 05 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नाशिक, वसई विरार, लातूर, भिवंडी : काल 05 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

6 मे 2025 रोजीचा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव

नाशिक, वसई विरार, लातूर, भिवंडी : आज 06 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 840 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : आज 06 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 810 रुपये प्रति 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News