सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्यात ! 7 मे रोजी दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय ? 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे महाराष्ट्रातील रेट पहा….

सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत आज पुन्हा एक मोठा बदल पाहायला मिळाला. या दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत आज मोठी वाढ झाली असून आज आपण सात मे 2025 रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर कसे आहेत? याचा एक आढावा घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात सोन्याने एका लाखाचा टप्पा पार केला होता. 22 एप्रिल रोजी सोने एका लाखाच्या वर पोहोचले मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 23 तारखेला किमती पुन्हा एका लाखाच्या खाली आल्यात.

22 एप्रिल रोजी सोन्याची किंमत 3000 रुपयांनी वाढून एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली होती मात्र 23 एप्रिलला ही किंमत 3000 रुपयांनी कमी झाली. तेव्हापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू होती.

मे महिन्याच्या सुरुवातीलाही किमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून अर्थातच पाच मे 2025 पासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ झाली. पाच मेला 24 कॅरेट सोन्याची किंमत 220 रुपयांनी वाढून 95 हजार 730 रुपयांवर पोहोचली.

यानंतर सहा मेला शुद्ध सोन्याची किंमत म्हणजे 24 कॅरेट सोन्याची किंमत 2730 रुपयांनी वाढून 98 हजार 460 रुपयांवर पोहोचली. दरम्यान आज 7 मे 2025 रोजी पुन्हा एकदा किमतीत मोठी वाढ दिसली आहे.

अजूनही सोने एक लाखाच्या आतच आहे मात्र लवकरच सोने एका लाखाचा टप्पा पुन्हा पार करणार असे चित्र आता तयार झाले आहे. अशा परिस्थितीत आता आपण सात मे 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे याचा एक आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याची किंमत

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये सोन्याच्या किमती नेहमीच सारख्या असतात. आज राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 750 रुपये प्रति दहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

आज या सर्व शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 410 रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 540 रुपयांनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी : या शहरांमध्ये सुद्धा सोन्याच्या किमती नेहमीच सारख्या असतात. आज राज्यातील या 4 प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 780 रुपये प्रति दहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

चांदीची किंमत कशी आहे

चांदीची किंमत आज पुन्हा एकदा वाढली. काल चांदीची किंमत 96,900 रुपये प्रति किलो एवढी होती मात्र आज सात मे 2025 रोजी एक किलो चांदीची किंमत 99 हजार रुपये एवढी नमूद करण्यात आली आहे. आज चांदीच्या किमतीत किलोमागे 2,100 रुपयांची वाढ झाली आहे  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe